जिल्ह्यातील ५९ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष‎, आरोग्य यंत्रणा अलर्ट 

By जितेंद्र दखने | Published: April 20, 2023 06:46 PM2023-04-20T18:46:23+5:302023-04-20T18:46:34+5:30

अमरावती जिल्ह्यातील ५९ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष उभारण्यात आली आहेत. 

 Heat stroke rooms have been set up in 59 primary health centers in Amravati district  | जिल्ह्यातील ५९ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष‎, आरोग्य यंत्रणा अलर्ट 

जिल्ह्यातील ५९ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष‎, आरोग्य यंत्रणा अलर्ट 

googlenewsNext

अमरावती: उन्हाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे.‎ त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता‎ आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष ‎कार्यान्वित केले आहेत. दरम्यान, वातावरणातील  बदलाबाबत जागृती निर्माण करणे, आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे,‎ त्यासाठी आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ ‎ प्रशिक्षित करण्यात येत आहे.‎ 

वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी ‎आरोग्यावर; तसेच विविध आजारांच्या प्रमाणावर‎ होत आहे. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊनच २०२०-२१ पासून राष्ट्रीय वातावरणातील बदल‎ आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. ‎वातावरणातील बदलाला संवेदनशील असणाऱ्या ‎आजारांना समर्थपणे तोंड देता यावे, यासाठी सर्व‎ नागरिक आणि विशेषतः लहान मुले, महिला,‎ वृद्धांसह नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण‎ करण्यात येत आहे.‎ उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका निर्माण होत‎ ‎ आहे. अशा परिस्थितीत तत्काळ उपचार होणे‎ गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक‎ आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष तयार करण्यात‎ आले आहेत.
 
ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
चक्कर येणे सुस्त वाटणे, त्वचा‎ लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे‎ ठोके वाढणे आदी उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने डॉक़्टरांचा सल्ला घ्यावा.

हीट वेव्ह म्हणजे काय?
हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमानात ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट, असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे.
 
दिवसेंदिवस उन्हाचा पार चांगलाच वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ५० पीएचसीमध्ये उष्माघात कक्ष सुरू केलेले आहेत. या ठिकाणी आवश्यक औषधी व डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे. खबरदारीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या आहेत. नागरिकांनी उष्माघाताची लक्षणे आढळताच डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. - डॉ. सुभाष ढोले, 

 

Web Title:  Heat stroke rooms have been set up in 59 primary health centers in Amravati district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.