१३ मेपर्यत उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 07:23 PM2022-05-09T19:23:26+5:302022-05-09T19:24:03+5:30

११ ते १३ मे दरम्यान अमरावती व अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

Heat wave up to 13 May | १३ मेपर्यत उष्णतेची लाट

१३ मेपर्यत उष्णतेची लाट

googlenewsNext

अमरावती : सध्या वायव्य मध्य प्रदेशच्या १५०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. असनी तीव्र चक्रीवादळ पोर्टब्लेयरच्या ७०० किमी वायव्येस आहे व १० ला वायव्य दिशेने मार्गक्रमण करीत आंध्र प्रदेश, ओरिसा किनारपट्टीजवळ पोहचेल. त्यानंतर मार्ग बदलून ईशान्य दिशेने मार्गक्रमण करण्याची व पुढील दोन दिवसांत या वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे चार ते पाच दिवस जिल्ह्यासह विदर्भात पावसाची शक्यता कमी व वातावरण अंशतः ढगाळ राहील. त्यानंतर ११ ते १३ मे दरम्यान अमरावती व अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

Web Title: Heat wave up to 13 May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान