धारणीत दुकानांना भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:38 AM2019-08-30T01:38:43+5:302019-08-30T01:40:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारणी : शहरापासून एक किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे अमरावती ते बºहाणपूर मुख्य मार्गावर कुसुमकोट खुर्द फाट्यावरील दोन ...

Heavy flames for the shops that hold | धारणीत दुकानांना भीषण आग

धारणीत दुकानांना भीषण आग

Next
ठळक मुद्देदोन दुकाने जळून खाक : २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहरापासून एक किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे अमरावती ते बºहाणपूर मुख्य मार्गावर कुसुमकोट खुर्द फाट्यावरील दोन दुकानांना बुधवारी रात्री १० वाजता अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिक धावून गेले. मात्र, पाहता पाहता ही दुकाने जळून खाक झाली .
पोलीस सूत्रांनुसार, कुसुमकोट खुर्द फाट्यावर भीमराव नागले यांचे कुशन वर्क, स्पेअर पार्ट आणि रेडियमचे दुकान आहे. बुधवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून भीमराव घरी आले. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना दुकानाला आग लागल्याचे फोनवरून एकाने कळविले. घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्यांच्या दुकानात जवळपास २० लाख रुपये किमतीचे साहित्य होते. याच दुकानाला लागून असलेल्या शैलेश युवराज शिटोले (रा. शिरपूर) यांच्या मोटरसायकल गॅरेजलासुद्धा आगीने कवेत घेतले. यामध्ये शैलेश शिटोले यांचे जवळपास ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही आगग्रस्तांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी तसेच धारणी पोलिसांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली आहे .
घातपाताची शक्यता
धारणी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. तथापि, आग लागली त्यावेळी पाऊस पूर्णपणे थांबला होता. अशा परिस्थितीत अचानक दुकानाला आग लागण्यामागे घातपाताची शंका दोन्ही दुकानदारांनी व्यक्त केली आहे. पाऊस सुरू असता, तर ते जबर नुकसानापासून बाचले असते. घटनास्थळी उपस्थित अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीच्या भीषणतेमुळे कोणी काही करू शकले नाही.
फायर ब्रिगेडची मागणी
धारणी तालुक्यात १७० गावे आहेत. तालुका मुख्यालयी अग्निशमन वाहन नसल्यामुळे वारंवार लागणाऱ्या आगी नियंत्रणासाठी शंभर किलोमीटरवरील अचलपूर , बराणपुर आणि खंडवा येथून फायर ब्रिगेडची प्रतीक्षा करावी लागते. बुधवारच्या आगीनंतर फायर ब्रिगेडची मागणी पुन्हा पुढे आली आहे.

नागलेंची महसूल पोलिसांकडे तक्रार
भीमराव गणपत नागले यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. आपल्या दुकानातील स्पेअर पार्ट, कुशन, रेडियमचे बंडल, काही रोख असा २० लाख रूपयांचा ऐवज जळून खाक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुसुमकोट खुर्दकडे जाणाºया फाट्याजवळ आपण ते दुकान भाड्याने घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Heavy flames for the shops that hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग