विदर्भात १६ जूनला जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:52 AM2019-06-13T01:52:23+5:302019-06-13T01:52:40+5:30
चक्रीवादळ वायू मुंबईपासून ५०० किमी अंतरावर असून, शंभर ते १२५ किमी वेगाने पसरत असून, ते पुढील सहा तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करणार आहे. १३ जूनला पोरबंदरला धडण्याची शक्यता वाढल्यामुळे विदर्भात १६ ते १८ जून दरम्यान बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चक्रीवादळ वायू मुंबईपासून ५०० किमी अंतरावर असून, शंभर ते १२५ किमी वेगाने पसरत असून, ते पुढील सहा तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करणार आहे. १३ जूनला पोरबंदरला धडण्याची शक्यता वाढल्यामुळे विदर्भात १६ ते १८ जून दरम्यान बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
तापमान हळूहळू कमी होईल. बुधवार, गुरुवारी अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. १५ जूनला विदर्भात बहुतांश जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळणार असून, चक्रीवादळ वायू मुंबईपासून ५०० किमी. नैऋत्त्येला आहे. हे वादळ पुढील सहा तासांत अत्यंत तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. तसेच हे वादळ शंभर ते १२५ किमी. वेगाने १३ जूनला पोरबंदर (गुजरात) ला धडकण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभवामुळे मुंबईत जोरदार पाऊस पडत असून, त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून शनिवारच्या आसपास धडक देण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रात पाऊस वाढणार
हे वादळ पुढे पाकिस्तानमध्ये घुसण्याची शक्यता आहे. परंतु मुंबईला पोहोचल्यावर मान्सूनची पुढील हालचाल कशी राहील, याबाबत सध्या ठामपणे सांगता येणार नाही. परंतु या वादळामुळे महाराष्ट्रात निश्चितच पाऊस वाढणार असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान शासत्र विभागाचे अनिल बंड म्हणाले.