दोन महिन्यांनी धुवांधार पाऊस, अमरावतीत तीन तालुक्यांसह १८ मंडळात अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:09 PM2023-09-16T17:09:22+5:302023-09-16T17:22:13+5:30

नदी-नाल्यांना पूर, वाहनासह एक वाहून गेला

Heavy rains after two months, heavy rains in 18 mandals including three taluks | दोन महिन्यांनी धुवांधार पाऊस, अमरावतीत तीन तालुक्यांसह १८ मंडळात अतिवृष्टी

दोन महिन्यांनी धुवांधार पाऊस, अमरावतीत तीन तालुक्यांसह १८ मंडळात अतिवृष्टी

googlenewsNext

अमरावती: जुलैनंतर दोन महिन्यांनी जिल्ह्यात सार्वत्रिक, दमदार पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये चांदूरबाजार, चिखलदरा व धारणी तालुक्यांसह तब्बल १८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी चांदूर रेल्वे, नांदगाव व धामणगाव तालुक्यात मात्र तुरळक सवरुपाचा पाऊस झाला.

जिल्ह्यात ११ तालुक्यात धुवांधार पाऊस बरसल्याने नदी-नाल्यांना पूर आला व काठालगतच्या शेतात पाणी घुसल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले. याशिवाय घरांची पडझड झाली. शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला पूर आलेला आहे व पुलावरुन पाणी वाहत असतांना गाडी टाकल्याने एकजण गाडीसहीत वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली. पोळ्याच्या पाडव्याला सकाळपासून संततधार पाऊस सुरु असल्याने अनेकांना घराबाहेर पडता आलेले नाही.

Web Title: Heavy rains after two months, heavy rains in 18 mandals including three taluks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस