दमदार पावसाने खरिपाची ९६ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:32+5:302021-07-26T04:11:32+5:30

अमरावती : जिल्ह्यात १० जुलैनंतर मान्सून सक्रिय झाल्यानंतर सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या ९६ टक्के पेरण्या आटोपल्या ...

Heavy rains sow 96% of kharif | दमदार पावसाने खरिपाची ९६ टक्के पेरणी

दमदार पावसाने खरिपाची ९६ टक्के पेरणी

Next

अमरावती : जिल्ह्यात १० जुलैनंतर मान्सून सक्रिय झाल्यानंतर सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरिपाच्या ९६ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत ६,६४,५९१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली असली तरी अद्याप ३४,१९७ हेक्टर क्षेत्र नापेर आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व पेरण्या आटोपणार आहेत.

खरिपाकरिता जिल्ह्यात ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा १० जूनला मान्सूनचे आगमन झाल्याने खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली. मात्र, मान्सून सक्रिय झालाच नाही. पाऊस विखुरत्या स्वरूपात झाला. त्यातही ३० जून ते ९ जुलैपर्यंत पावसाचा खंड राहिला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या थांबल्या, तर किमान २५ हजार हेक्टरमधील पिकांना मोड आले.

पुन्हा ९ जुलैनंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पेरण्यांची लगबग सुरू झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६,६४,५९१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ४४,५०८ हेक्टर, चिखलदरा २४,४७१, अमरावती ५३,२६८, भातकुली ४९,२६४, नांदगाव खंडेश्वर ६३,४७४, चांदूर रेल्वे ३९,१५७, तिवसा ४०,२३४, मोर्शी ५५,४४८, वरुड ५०,०६२, दर्यापूर ७३,००२, अंजनगाव सुर्जी ४०,१७६, अचलपूर ३८,८५०, चांदूर बाजार ३८,६२१ व धामणगाव तालुक्यात ५४,०२८ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

बॉक्स

सोयाबीनची सर्वाधिक पेरणी

जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,७४८ हेक्टर, चिखलदरा ८,८६०, अमरावती ३१,३७६, भातकुली २८,६७१, नांदगाव खंडेश्वर ४७,६२१, चांदूर रेल्वे २३,६६१, तिवसा १७,१४०, मोर्शी १३,६०२, वरुड १,७५७, दर्यापूर १२,२६४, अंजनगाव सुर्जी १४,१६८, अचलपूर ८,८५०, चांदूर बाजार १२,३७८ व धामणगाव तालुक्यात २४,५३१ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

बॉक्स

कपाशीची २,२२,२४६ हेक्टरमध्ये पेरणी

यंदा कपाशीची २,२२,२४६ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ९,३०० हेक्टर, चिखलदरा २,४१२, अमरावती १३,६४०, भातकुली १०,९४३, नांदगाव खंडेश्वर ६,०७६, चांदूर रेल्वे ८,२८५, तिवसा १६,६७८, मोर्शी २५,५९२, वरुड २७,८६४, दर्यापूर ३१,९५६, अंजनगाव सुर्जी १४,९५२, अचलपूर १७,८७१, चांदूर बाजार १५,५८९ व धामणगाव तालुक्यात २१,०८७ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे.

पाॅईंटर

...अशी झाली पेरणी

धान ५,६५२ हेक्टर

ज्वारी १४,३४१ हेक्टर

मका १७,७४२ हेक्टर

तूर १,१९,३०६ हेक्टर

मूग १६,३८० हेक्टर

उडीद ५,५६२ हेक्टर

Web Title: Heavy rains sow 96% of kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.