वाघोडा, धानोरा शिक्रा परिसरात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:59+5:302021-09-26T04:13:59+5:30

पान २ सेकंड लीड फोटो - नांदगाव खंडेश्वर २५ ओ नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील वाघोडा, धानोरा शिक्रा परिसरात शुक्रवारी ...

Heavy rains in Waghoda, Dhanora Shikra area, huge losses to farmers | वाघोडा, धानोरा शिक्रा परिसरात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

वाघोडा, धानोरा शिक्रा परिसरात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Next

पान २ सेकंड लीड

फोटो - नांदगाव खंडेश्वर २५ ओ

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील वाघोडा, धानोरा शिक्रा परिसरात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.

तालुक्यात ६ सप्टेंबरच्या अतिवृष्टीनंतर या भागात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी दुपारी वाघोडा परिसरात ४ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास झालेल्या या पावसामुळे परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेले सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही शेतांमध्ये सोयाबीनला कोंब फुटले असल्याचेही दीपक भगत या शेतकऱ्याने सांगितले.

सततच्या पावसामुळे या भागातून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नुकसानाची त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच जीविता जगताप, उपसरपंच ओमप्रकाश सावळे, गजानन राऊत, विनोद जगताप, सुनील मेटकर, होमदेव ढाकूलकर व बऱ्याच शेतकऱ्यांनी केली. वाघोडा परिसरात यापूर्वी ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. त्याचे अद्यापही पंचनामे झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच शुक्रवारी पुन्हा झालेल्या अतिवृष्टीमुळे उरलेसुरले पीकसुद्धा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

250921\img-20210925-wa0008.jpg

वाघोडा, धानोरा शिक्रा परिसरात अतिवृष्टी. शेती पिकाचे अतोनात नुकसान

Web Title: Heavy rains in Waghoda, Dhanora Shikra area, huge losses to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.