वरूड तालुक्यात वादळी पावसाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:04+5:302021-05-17T04:12:04+5:30
फोटो पी १६, वरूड, रेन, जावरे, टाकरखेडा फोल्डर अमरावती : रविवारी दुपारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी पावसाने थैमान ...
फोटो पी १६, वरूड, रेन, जावरे, टाकरखेडा फोल्डर
अमरावती : रविवारी दुपारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी पावसाने थैमान घातले. यात वरूड तालुकयाला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी घरावरील छपरे उडाली. सोसाट्याने वार्याने अनेक झाडे वीजताारांवर कोसळल्याने वीजपुरवठा खडित झाला. नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे तालुका वगळता अन्य दहा तालुक्यात दुपारी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला.
आमनेर येथे मोठे नुकसान
वरूड : तालुक्यात दुपारी चारच्या सुमारास अचानक वादळी पावसाने सुरुवात केली. शहरासह तालुक्यातील घराची छपरे आणि झाडे उन्मळून पडली. आमनेर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही भागातील विज पुरवठा खंडित झाला आहे. तालुक्यात रविवार दुपारी चारच्या सुमाराला वादळी पावसाळा सुरुवात झाली. यामधे आमनेर येथील शंभरपेक्षा अधिक घराची छपरे उडाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकदरा, बाभुळखेडा, ढगा, घोराड, बेसखेडा, सुरळी, कुरळी, रोशनखेडा, चिंचरगव्हान, उदापूर सह आदी गावामध्ये वादळी पावसाचा तडाखा बसला. प्रभारी तहसीलदार देवानंद धबाले सह तलाठी यांचे पथकाने आमनेर येथे जाऊन पंचनामे केले.
अन्य तालुक्यातही पाऊस
चांदूर रेल्वे : शहरात रविवारी साडेचार वाजता पावसाला सुरवात झाली आहे. वादळी पाऊस झाला याबाबत कुठलीही नुकसानीची नोंद नसल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोर्शी : मोर्शी मध्ये दुपारी पावसाची सरी येऊन गेल्या. वादळ नाही. केवळ पाच मिनिटांचा पाऊस झाला. तिवसा : येथे देखील केवळ पाच मिनिट पाऊस झाला. भातकुली : तालुक्यातील टाकरखेडा संभु-साऊर टाकरखेडा संभु परिसरात अचानक जोरदार वादळासह पाऊस आल्यामुळे मार्गावर झाडे पडल्यामुळे मार्ग बंद झाला. तसेच विजेचे खांब सुध्दा वाकले आहेत. तर, धामणगाव तालुक्यात ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडला नाही. धारणी : येथे सहा वाजता जोरयाच्या हवेसह पाऊस आला. तर हरीसालला दुपारी तीन वाजता जोरदार हवेसह पाऊस आला. दर्यापूर मध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.