तुरीचे उभे पीक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:33 PM2017-11-15T23:33:07+5:302017-11-15T23:33:24+5:30
बाजूच्या शेताच्या धुऱ्याऱ्या लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : बाजूच्या शेताच्या धुऱ्याऱ्या लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली.
तालुक्यातील जळगाव आर्वी येथील बिसन मोतीराम सहारे यांच्या मालकीचे तीन एकर शेती आहे. दरवर्षी ते शेतात तुरीचे पीक घेतात. यंदा दीड एकरात म्हाडा तुरीची पेरणी केली होती. दोन दिवस मजूर न मिळाल्याने ही तूर सगण्यात आली नाही. बुधवारी बाजूच्या धुऱ्याला अचानक आग लागली.
या आगीने उग्र रूप धारण केले. शेतकऱ्याने त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. यामुळे त्याच्या शेतातील पूर्ण तूर जळून खाक झाली. माहिती मिळताच तलाठी गणेश ऊइके, कृषी सहायक कविता राजेंद्र ठाकरे यांनी जळालेल्या तुरीचा पंचनामा केला. घरात येणारी तूर आगीत भस्मसात झाल्याने या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : बाजूच्या शेताच्या धुºयाºया लागलेल्या आगीने उग्ररूप धारण केल्याने दीड एकारातील तूर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे उघडकीस आली.
तालुक्यातील जळगाव आर्वी येथील बिसन मोतीराम सहारे यांच्या मालकीचे तीन एकर शेती आहे. दरवर्षी ते शेतात तुरीचे पीक घेतात. यंदा दीड एकरात म्हाडा तुरीची पेरणी केली होती. दोन दिवस मजूर न मिळाल्याने ही तूर सांगण्यात आली नाही. बुधवारी बाजूच्या धुºयाला अचानक आग लागली.
या आगीने उग्र रूप धारण केले. शेतकºयाने त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. यामुळे त्याच्या शेतातील पूर्ण तूर जळून खाक झाली. माहिती मिळताच तलाठी गणेश ऊइके, कृषी सहायक कविता राजेंद्र ठाकरे यांनी जळालेल्या तुरीचा पंचनामा केला. घरात येणारी तूर आगीत भस्मसात झाल्याने या शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. यामुळे शेतकºयावर उपासमारीची पाळी आली आहे.