गारपीटग्रस्तांंना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:42 PM2018-02-14T22:42:52+5:302018-02-14T22:43:16+5:30

Help 50,000 hectare of hail affected farmers | गारपीटग्रस्तांंना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

गारपीटग्रस्तांंना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

Next
ठळक मुद्देखासदारांची मागणी : सुधीर मुनगंटीवारांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
अमरावती : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ४८ हजार हेक्टरमधील रबी पिके व फळपिकांचे नुकसान झाले. शेतकरी प्रचंड अडचणीत असल्यामुळे त्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ५०० गावांतील ४८ हजार हेक्टरमधील गहू, हरभरा, कांदा, संत्री व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी पिके उद्ध्वस्त झाली. संत्र्याचा अंबिया बहर गळाला. गहू पडला, तर हरभऱ्याचे नुकसान झाले. यापूर्वी खरीप हंगामाचे अपुऱ्या पावसाने नुकसान झाले, तर बोंड अळीने कापसाचे पीक हातचे गेले. अद्याप सर्वेक्षण सुरू झालेले नाही. त्यामुळे महसूल यंत्रणेवर विसंबून न राहता सर्व यंत्रणांचा यामध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संजय बंड, राजेश वानखडे, सुनील खराटे, प्रशांत वानखडे, ज्ञानेश्वर धाने, शोभा गायकवाड, वर्षा भोयर, रेखा खारोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Help 50,000 hectare of hail affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.