६ हजार हेक्टर बाधित क्षेत्राला मिळणार मदत

By admin | Published: April 17, 2015 12:23 AM2015-04-17T00:23:48+5:302015-04-17T00:23:48+5:30

जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जीवितहानी, वित्तहानी व शेतीपिकांच्या

Help to get 6 thousand hectare affected areas | ६ हजार हेक्टर बाधित क्षेत्राला मिळणार मदत

६ हजार हेक्टर बाधित क्षेत्राला मिळणार मदत

Next

अवकाळीचे नुकसान : विशेष बाब म्हणून हेक्टरी १० हजार रुपये
अमरावती :
जिल्ह्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जीवितहानी, वित्तहानी व शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने १३ एप्रिलला घेतला. याविषयी ९ एप्रिलला मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती.
जिल्ह्यात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी अवकाळी ४४६ गावे बाधित झाली होती. यामध्ये २ जण दगावले. १२ जण जखमी झालेत. ४२ हजार ७६६ हेक्टर शेतीपिकांचे ५० टक्क्यांच्या आत व ६ हजार १२१ हेक्टर शेतीपिकांचे ५० टक्क्यांवर नुकसान झाले. शासन निर्णयानुसार धामणगाव, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यातील ६ हजार १२१ हेक्टर शेतीपिकाला ही मदत मिळणार आहे.
शेतीपिके, फळपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २० हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत ही मदत राहणार आहे. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रूपये व बहुवार्षिक फळपिकांकरिता मदतीची किमान मर्यादा १५०० रूपये राहणार आहे.
शासन निर्णयानुसार कोरडवाहू पिकाकरिता १० हजार प्रतिहेक्टर, सिंचनाखालील पिकांकरिता १५ हजार रूपये प्रतिहेक्टर, बहुवार्षिक पिकांकरिता २५ हजार रूपये प्रति हेक्टर खरडून गेलेल्या जमिनीकरिता २० हजार रूपये प्रतिहेक्टर व वाहून गेलेल्या जमिनीकरिता २५ हजार रूपये प्रति हेक्टर व २ हेक्टर मर्यादेपर्यंत विशेष बाब म्हणून मदत देण्यात येणार आहे.
मृत व्यक्तींच्या वारसांना प्रति व्यक्ती दीड लाख रूपये व मुख्यमंत्री निधीतून एक लाख असे २ लाख ५० हजार देण्यात येणार आहे. मृत जनावरांच्या मालकांना जनावर मोठे असल्यास २५ हजार, मध्यम असल्यास १० हजार, लहान असल्यास ५ हजार रूपये मर्यादेमध्ये देण्यात येणार आहे. पूर्ण उद्धवस्त झालेल्या घरांना ७० हजार रूपये निधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

अवकाळीने
चार तालुके बाधित
जिल्ह्यात अवकाळी पावसाने अमरावती, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे तालुक्यातील ४८ हजार ८८७ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यापैकी ५० टक्क्यावर नुकसान झालेल्या ६ हजार १२१ हेक्टर ६९ आर क्षेत्राला विशेष बाब म्हणून मदत मिळणार आहे.

कर्जाचे पुनर्गठन, तीन महिन्यांचे व्याज, वीजबिल माफ
शासनाने जाहिर केलेल्या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. सहकार कर्जाचे पुनर्गठन करण्यात येऊन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यात येणार आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जावरील व्याज माफ करण्यात येऊन तिमाही वीज बिलात माफी देण्यात येणार आहे. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी व फी माफी राहणार आहे.
यांना मिळणार मदत
फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे ४ तालुक्यांतील ४९६ गावे बाधित झाले. यामध्ये वीज पडून भातकुली तालुक्यातील २ व्यक्ती मृत झाल्या. दर्यापूर व चांदूररेल्वे तालुक्यामधील १२ व्यक्ती जखमी झाल्या व ६ हजार १२१ हेक्टरमधील शेती पिके व फळ पिकांचे नुकसान झाले. यासाठी विशेष बाब म्हणून शासन मदत देणार आहे.

Web Title: Help to get 6 thousand hectare affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.