अतिवृष्टीसाठी मिळणार मदत

By admin | Published: February 3, 2017 12:18 AM2017-02-03T00:18:29+5:302017-02-03T00:18:29+5:30

गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाली.

Help to get rich | अतिवृष्टीसाठी मिळणार मदत

अतिवृष्टीसाठी मिळणार मदत

Next

महसूलचे आदेश : १३ हजार हेक्टर क्षेत्राकरिता
अमरावती : गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यामुळे बाधित पिकांना शासनाद्वारे मदत देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. याबाबत ९ जानेवारीला महसूल विभागाचे आदेश धडकले.
राज्यात गतवर्षी जून ते आॅक्टोबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिके बाधित झालीत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक ८६७.८ मिली. व ११५.२ टक्के पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ३३ टक्क्यावर नुकसान झालेल्या पिकांना शासन निर्णयामुळे मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर या पीक विमा योजनेच्या निकषानुसार विमा यंत्रणेद्वारे मदत देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेंतर्गत मंडळनिहाय भरपाईची जी मदत देय असेल त्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात ५२ दिवस विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी साचल्यामुळे हजारो हेक्टरमधील तूर पिकावर ‘मर’ रोगाचे आक्रमण झाले. यामुळे सरासरी उत्पन्नात घट झाली. आता शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे बाधित पिकांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दोन हेक्टर मर्यादेत राहणार मदत
प्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीसाठी ३३ टक्के व त्याहून अधिक नुकसान झालेल्यांसाठी ही मदत मिळणार आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादेत मिळणार आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्याबाबत शासनाला सादर अहवालानुसार ही मदत मिळणार आहे.

पंचनाम्यासोबत छायाचित्र अनिवार्य
अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यासोबत जीपीएस छायाचित्र आवश्यक आहे. उभे पीक, त्याचे नुकसान या सर्व बाबीसोबत संबंधित शेतकरी शेतात उभे असल्याचे या चित्रात दिसावयास हवे. मदत बँक खात्यात थेट रकम जमा करण्यात येईल व या मदतीमधून बँकेला कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.

Web Title: Help to get rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.