कर्करूग्ण कबड्डीपटूला निर्मल उज्ज्वलकडून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 10:30 PM2019-02-08T22:30:39+5:302019-02-08T22:31:02+5:30
कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करीत अक्षरश: मृत्यूशी झुंज देत असलेला जिल्ह्यातील तरुण नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्यावरील उपचाराकरिता निर्मल -उज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेत त्याला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. निर्मल-ऊज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील निर्मल उज्ज्वलच्या शाखांतर्फे वृषभ बानापुरेच्या नांदगाव पेठ येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांना ही रक्कम शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करीत अक्षरश: मृत्यूशी झुंज देत असलेला जिल्ह्यातील तरुण नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्यावरील उपचाराकरिता निर्मल -उज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेत त्याला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
निर्मल-ऊज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील निर्मल उज्ज्वलच्या शाखांतर्फे वृषभ बानापुरेच्या नांदगाव पेठ येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांना ही रक्कम शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली.
केसरी क्रीडा मंडळाचा नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरेला तीन महिन्यांपूर्वी कर्करोगाने ग्रासले आहे. नागपूर येथे उपचार घेत असलेल्या वृषभची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आठ ते दहा लाखांचा खर्च कसा करावा या विवंचनेत बानासुरे कुटुंबीय होते. अशा हलाखीच्या परिस्थितीत वृषभच्या कबड्डीपटू सहकाऱ्यांनी कबड्डी स्पर्धेत जिंकलेली बक्षिसाची रक्कम त्याच्या उपचाराकरिता देणे सुरू केले. वृषभ बानासुरेच्या निवासस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात निर्मल उज्ज्वलचे शिखर संचालक प्रदीप राऊत, पालक संचालक प्रवीण भुजाडे, ऋषिकेश पाटील, अतुल मेटे, प्रवीण केणे, राजेंन्द्र पाटील आदींसह निर्मल-उज्ज्वलच्या विविध शाखांचे व्यवस्थापक भावना जोशी, विनोद बेले, अविनाश वानखडे, अजय राऊत, नीलेश बलखंडे, नीरज इंगोले, प्रमोद गायकवाड, दीपक गोफणे, चेतन मालधुरे, विभागीय व्यवस्थापक आशिष राजूरकर, नागेशकर तिजारे, समीर माकोडे, योगेश बिडकर निखील नांदूरकर उपस्थित होते.