प्रेमसंबंधात मदत केल्याने तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:07 PM2018-05-07T23:07:51+5:302018-05-07T23:08:42+5:30

बहिणीसोबत मित्राचे प्रेमसंबंध जुळविण्यास मदत केल्याच्या रागातून भावाने अन्य साथीदारांसह एका तरुणाची चाकूने हल्ला करून हत्या केली. योगेश पुंडलिक गाडे (३५,रा. महात्मा फुलेनगर) असे मृताचे नाव आहे.

Helping with love, the murder of the youth | प्रेमसंबंधात मदत केल्याने तरुणाची हत्या

प्रेमसंबंधात मदत केल्याने तरुणाची हत्या

Next
ठळक मुद्देराहुलनगरातील घटना : दोन अटक, एक पसार, १० पर्यंत पीसीआर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहिणीसोबत मित्राचे प्रेमसंबंध जुळविण्यास मदत केल्याच्या रागातून भावाने अन्य साथीदारांसह एका तरुणाची चाकूने हल्ला करून हत्या केली. योगेश पुंडलिक गाडे (३५,रा. महात्मा फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास फे्रजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिच्छुटेकडी स्थित राहुलनगरात घडली. या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक आरोपी पसार झाला आहे.
पोलीस सुत्रानुसार सुशील ऊर्फ खांड्या राजेंद्र वानखडे (२९,रा. महात्माफुलेनगर, नवसारी) व सय्यद नाजीम स. सालार (२९,रा. बिच्छुटेकडी) अशी अटक आरोपींची नावे असून, शाहरूख नावाचा एक आरोपी पसार झाला आहे. आरोपी सुशीलच्या बहिणीशी एकतर्फी प्रेमातून सागर प्रभाकर वसुकर हा पाठलाग करायचा.
सागर हा बहिणीची छेडखाणी करीत असल्याचे सुशीलला माहिती झाले होते. तिमे गाडगेनगर पोलिसांकडे तीन दिवसांपूर्वी तक्रारही दिली होती. पोलिसांनी सागर वसुकरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. पोलीस सागरच्या शोधात होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सुशीलने संतोष शिवदास वानखडेला फोन करून योगेश गाडेला पंचवटी चौकात घेऊन येण्याचे सांगितले. त्यानुसार संतोष व योगेश हे दोघेही रात्री ९.१० वाजता पंचवटी चौकात पोहोचले आणि आरोपींना भेटले.
विश्वनाथ गडलिंगची चौकशी
आरोपींनी संगनमत करून योगेश गाडेला दुचाकीवर बसवून चपराशीपुरा मार्गे राहुलनगरात गेले. त्याच्यासोबतच संंतोष वानखडेसुद्धा आपली दुचाकी घेऊन पोहोचला. आरोपींनी योगेश गाडेला राहुलनगरातील रहिवासी विश्वनाथ गडलिंग यांच्या घरावरील स्लॅबवर नेले. त्यावेळी रात्रीचे ९.३० वाजले होते. सागर वसुकरला सपोर्ट का करतो, तुला आज मारतो, असे म्हणून आरोपी सय्यद नाजीम व शाहरुख या दोघांनी काठीने योगेशला मारहाण सुरू केली.
सुशीलने चाकू काढून योगेशच्या मांडीवर व पायावर वार केले. जीव वाचविण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत योगेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेजारीच असणाऱ्या एका कौलाच्या घरावर छंलाग लावून तो पळून जात असताना, अचानक चक्कर येऊन तो रावसाहेब गोंडाणे यांच्या घरासमोर खाली पडला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. रावसाहेबांनी सीआर मोबाइल व्हॅनला माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमी योगेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. संतोष वानखडे याच्या तक्रारीवरून आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३६४, ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात डीबी पथकातील प्रवीण ढवळे, अनूप झगडे, सागर भजगवरे व राम लोखंडे यांनी आरोपींना अटक केली.
विश्वनाथ गडलिंग याच्या परिचयातील आरोपी नाजीम हा मित्रांना घेऊन स्लॅबवर गेला होता. गडलिंग याच्या घराविषयी परिसरात काही वेगळीच चर्चा आहे. फे्रजरपुरा पोलिसांनी घरमालक गडलिंगला चौकशीकरिता ताब्यात घेतले होते.
जखमी योगेशची घरावर उडी
आरोपींनी योगेश गाडेवर चाकूने हल्ला करून पाय व मांडीवर तीन घाव मारले. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत योगेशने शेजारच्या कौलाच्या घरावर उडी घेतली. उडी घेताच त्याचे पाय कौलात फसले होते. मात्र, जीव वाचविण्याच्या धडपड करीत योगेशने पळ काढत घरावरून मुख्य रस्त्यावर उडी घेतली. त्यानंतर चक्कर येऊन तो खाली पडला.
सागर वसुकरला अटक
सुशीलच्या बहिणीवर एकतर्फी प्रेम करणारा सागर वसुकरला गाडगेनगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. विनयभंग प्रकरणात तो पसार होता. योगेश गाडे हा सागर वसुकरचे सुशीलच्या बहिणीशी प्रेमसुत जुळविण्यात मदत करीत होता. तिच्या फेसबुकवर संदेश पाठवून सागरशी प्रेमसंबध ठेवण्याचे सल्ले देत होता. त्यामुळे योगेशला अद्दल घडवायची, या उद्देशाने आरोपींनी हल्ला केला होता.
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचेच
आरोपी सुशील, स. नाजीम व शाहरूख हे तिघेही गुन्हेगारी वृत्तीचे असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. नाजीम हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून, तो एका प्राणघातक हल्लाप्रकरणातून निर्दोष सुटला आहे. त्याचप्रमाणे सुशील वानखडेविरुद्ध काही वर्षांपूर्वी मारहाण व हल्ल्याचे गुन्हे दाखल आहे. या आरोपींविरुद्ध पोलिसांनी पूर्वी प्रतिबंधात्मक कारवायासुद्धा केल्या आहेत.

एका आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबध जुळविण्यात मदत करीत असल्याच्या कारणावरून योगेश गाडेची हत्या झाली. दोन आरोपींना अटक केली. १० मेपर्यंत पीसीआर मिळाला आहे. एकाचा शोध सुरू आहे.
- चिन्मय पंडित,
पोलीस उपायुक्त.

Web Title: Helping with love, the murder of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.