नाम फाउंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त सहा कुटुंबांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:35 AM2021-02-20T04:35:17+5:302021-02-20T04:35:17+5:30
टाकरखेडा संभू : नाम फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील सहा शेतकरी विधवा महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली. यातील दोन ...
टाकरखेडा संभू : नाम फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील सहा शेतकरी विधवा महिलांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत दिली. यातील दोन महिलांना जिल्हा परिषदेत समारंभपूर्वक, तर इतर चार महिलांना त्यांच्या गावात जाऊन मदतीचे धनादेश पोहोचते केले गेले.
नाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक वासुदेव जोशी आणि जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी या महिलांचे दु:ख नाम फाउंडेशनपर्यंत पोहचवले होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले यांच्या दालनात पार पडलेल्या कार्यक्रमात टाकरखेडा संभू येथील शीतल मनोज कोठार व सोनारखेडा येथील शिल्पा प्रशांत मानकर यांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक वासुदेव जोशी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, टाकरखेडाचे उपसरपंच प्रदीप शेंडे, प्रभाारी कृषी विकास अधिकारी उज्ज्वल आगरकर, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावकर, कृषी अधिकारी अशोक जाधव, मयूर काकडे, आकाश कोठार, अनिकेत शेकोकार आदी मान्यवर उपस्थित होते.