तळेगावात शिरला रानडुकरांचा कळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:40+5:302021-07-16T04:10:40+5:30

नागरिकांची पळापळ, हल्ल्यात तिघे जखमी तळेगाव दशासर : गावात शिरलेल्या रानडुकरांच्या कळपाने आडवे आलेल्या तिघांना जखमी केले. बुधवारी सकाळी ...

A herd of cows entered Talegaon | तळेगावात शिरला रानडुकरांचा कळप

तळेगावात शिरला रानडुकरांचा कळप

Next

नागरिकांची पळापळ, हल्ल्यात तिघे जखमी

तळेगाव दशासर : गावात शिरलेल्या रानडुकरांच्या कळपाने आडवे आलेल्या तिघांना जखमी केले. बुधवारी सकाळी ही घटना घडली. जखमींमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

तळेगावातील प्रभाग क्र. १ मध्ये बुधवारी सकाळी रस्ता भरकटलेल्या रानडुकरांचा कळप शिरला होता. त्यांना पाहताच रस्त्यावर असलेल्या नागरिकांची पळापळ झाली. या रानडुकरांनी थेट लोकांवर हल्ला चढवला. यामध्ये कमला मधुकर वकील (६०), किसन श्रीधर बेले (५०) व प्रमोद भगवन्त बेले हे जखमी झाले. त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकाराने गावातील नागरिक अद्याप भयभीत आहेत. वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा व जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: A herd of cows entered Talegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.