येथे वाहतोय पितृवात्सल्याचा झरा

By admin | Published: June 18, 2017 12:11 AM2017-06-18T00:11:33+5:302017-06-18T00:11:33+5:30

आई मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व असतो. पण या अस्तित्वाला समजून घेणे महत्त्वाचे आहे़

Here flows of flowing patriots | येथे वाहतोय पितृवात्सल्याचा झरा

येथे वाहतोय पितृवात्सल्याचा झरा

Next

आज पितृ दिवस : तेजस, संदेशला वडिलाचा अभिमान; पल्लवीने मांडली महती
मोहन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : आई मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व असतो. पण या अस्तित्वाला समजून घेणे महत्त्वाचे आहे़ बापाच्या मागे मुलांना खंबीरपणे वाढवणाऱ्या मातांची कहाणी अनेकदा शब्दबध्द होते़ पण न कळत्या वयातच मातृसुखाला पारखे झालेल्या पोटच्या गोळ्यांना मायेचा उबारा देणाऱ्या पितृवात्सल्याचा झरा अनेक घरांत वाहत असल्याचे दिसते़ आईविना असलेल्या चिमुकल्यांना सांभाळण्याचे काम तालुक्यातील बाप करीत आहे़
धामणगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथील प्रमोद मनोहरे यांची पत्नी नंदा यांच्या निधनानंतर त्यांनी मुलाला मातृत्वाचे प्रेम दिले़ त्यांना शिक्षण संस्काराची शिदोरी दिली़ मुलांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याचे काम हा बाप करीत आहे़ मोठा मुलगा तेजसने दहावीच्या परीक्षेत ६० गूण मिळविले़ लहान संदेश पाचवीत शिकत आहे़ या दोघांना कधीच आईची कमतरता या बापाने भासूू दिली नाही. दोन महिन्यांचा मुलगा त्यांच्या कुशीत सोडून पत्नीने जगाचा निरोप घेतला़ माझ्या शुभमला आईचा चेहराही आठवत नाही़ त्याच्या जन्मापासून त्याची आई झालो असल्याचे एक शेतमजूर बापाने सांगितले. केवळ पाच वर्षांची असताना माझी पल्लवी आईला पोरकी झाली. आईच्या विरहाच्या दुखातून तिला बाहेर काढण्यासाठी मला तिची आई बनायचे होते, असे या अशिक्षित बापाने दुसऱ्या लग्नाचा विचार आजही मनात येत नाही. मुलांच्या आईच्या निधनानंतर मुलांना कसे सांभाळावे लागते याचे उदाहरण मंगरूळ दस्तगीरचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले़ अंजनसिंगी येथील गौरी प्रांजळे व येथील संपदा रोंगे यांनीही वडिलांच्या प्रेमाला सलाम केला आहे.

Web Title: Here flows of flowing patriots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.