अरे बापरे.. झोपडपट्टीतील ग्राहकाला एक लाख १३ हजारांचे वीज देयक

By admin | Published: July 9, 2017 12:16 AM2017-07-09T00:16:34+5:302017-07-09T00:16:34+5:30

दसरा मैदान मार्गावरील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील एका वीज ग्राहकाला अरे बापरे म्हणण्याची वेळ आली आहे.

Hey Bapar .. One lakh 13 thousand electricity payment to the slum subscriber | अरे बापरे.. झोपडपट्टीतील ग्राहकाला एक लाख १३ हजारांचे वीज देयक

अरे बापरे.. झोपडपट्टीतील ग्राहकाला एक लाख १३ हजारांचे वीज देयक

Next

महावितरणाचा कारभार : वसंतराव नाईक झोपडपट्टीतील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दसरा मैदान मार्गावरील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील एका वीज ग्राहकाला अरे बापरे म्हणण्याची वेळ आली आहे. राजेश रामदास राऊत या ग्राहकाला एका महिन्याचे तब्बल १ लाख १३ हजार १०० रुपयांचे देयक आल्याने धक्काच बसला. या बिलाबाबत राऊत यांनी वीज वितरणकडे धाव घेतली असून सद्यस्थितीत तुम्हाला जेवढे देयके भरायचे तेवढे भरा, पुढे पाहू, असे उत्तर वीज मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले.
वीज वितरणाच्या तांत्रिक त्रुट्यांमुळे ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागला आहे. शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत जोडणीधारकांचा भुर्दंड सर्व सामान्याना सहन करावा लागत आहे. योग्य नियोजनाअभावी वीज वितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येते. आता तर झोपडपट्टीतील एका गरीब ग्राहकाला १ लाख १३ हजार १०० रुपयाचे बिल आल्याने गोंधळ उडाला आहे. महावितरणाकडून राजेश राऊत यांना मे २०१७ मधील वीज वापराचे ६ हजार ११४ युनिटचे बिल दिले असून ते बिल १ लाख १३ हजार १०० रुपयाचे आहे. एप्रिलमध्ये ४९ युनिट तर मे महिन्यात थेट १ लाख १३ हजार १०० रुपयांचे बिल आले. त्यामुळे राऊत यांनी संबंधित वीज कार्यालयाशी संपर्क केला. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी तुम्हाला जेवढे बिल भरायचे तेवढे भरा, पुढे, असे भाष्य केल्यामुळे राऊत यांनीही चुप्पी साधली आहे.
राऊत यांना आलेल्या अव्याढव्य बिलामुळे वीज वितरणाच्या कारभाराची पोलखोल नक्कीच केली आहे.

Web Title: Hey Bapar .. One lakh 13 thousand electricity payment to the slum subscriber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.