एचजी इन्फ्राचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:24 AM2018-09-21T01:24:59+5:302018-09-21T01:26:54+5:30
तालुक्यात काँक्रीट रोडचे बांधकाम जोरात सुरू असून, त्यासाठी परवानगी दिलेल्या रेडी मिक्स काँक्रीटच्या प्रकल्पाची जेथे उभारणी केली, त्या ठिकाणी कोठल्याही प्रकरणाच्या पर्यावरणीय बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याने मोठ्या प्रमाणावर.....
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यात काँक्रीट रोडचे बांधकाम जोरात सुरू असून, त्यासाठी परवानगी दिलेल्या रेडी मिक्स काँक्रीटच्या प्रकल्पाची जेथे उभारणी केली, त्या ठिकाणी कोठल्याही प्रकरणाच्या पर्यावरणीय बाबींची पूर्तता करण्यात आली नसल्याने मोठ्या प्रमाणावर या भागात वायूप्रदूषण, जलप्रदूषण, मृदाप्रदूषण होत असल्याची तक्रार नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पर्यावरण मंत्र्यांकडे दिली आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणात काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाºया रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध विभागांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
मिर्झापूर ग्रामपंचायतीनेसुद्धा या रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पाला तात्पुरती परवानगी दिल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली आहे. तथापि, प्रकल्पाशेजारी तालुका क्रीडा संकुल आहे. त्यामुळे या ठिकाणी खेळण्यासाठी येणाºया खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होत असून, या रस्त्यावरून वाहतूक करणाºयांनाही त्रास सहन करावा लागत आहे.