महापालिकेला ‘हाय अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:41 AM2019-08-02T01:41:09+5:302019-08-02T01:42:11+5:30
शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, नाल्या, गटारी तुडुंब भरल्याने डासांचा प्रादुर्भाव प्रमाण वाढला आहे. मात्र, यंदा डेंग्यूसारखे आजार वाढू नये, यासाठी महापालिकेला ‘अलर्ट’ जारी करीत खासदार नवनीत रवि राणा यांनी स्वत: पुढाकार घेऊन गुरुवारी फॉगिंग मशीनने डास निर्मूलनाचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले असून, नाल्या, गटारी तुडुंब भरल्याने डासांचा प्रादुर्भाव प्रमाण वाढला आहे. मात्र, यंदा डेंग्यूसारखे आजार वाढू नये, यासाठी महापालिकेला ‘अलर्ट’ जारी करीत खासदार नवनीत रवि राणा यांनी स्वत: पुढाकार घेऊन गुरुवारी फॉगिंग मशीनने डास निर्मूलनाचा प्रयत्न केला.
आठवडाभरापासून सार्वत्रिक पाऊस होत आहे. त्यामुळे सर्वत्र ओलावा निर्माण झाला असून, सूर्याचे दर्शन दुर्लभ झाले. नाल्या, गटारी तुंबल्याने दुर्गंधीसह डासांची उत्पत्ती वाढत आहे. याचा परिणाम आरोग्यावर जाणवत आहे. महापालिकेच्या काही भागांत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, अतिसाराची लागण झाल्याचे चित्र आहे. नागरिकांना यातून सावरण्यासाठी महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडल्याचे पाहून खासदारांसमवेत युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शहरात डास निर्मूलन फवारणी केली. यावेळी खासदार नवनीत राणांसह आमदार रवि राणा यांनीही फॉगिंग मशीनने फवारणी करून महापालिकेला गांभीर्य लक्षात आणून दिले. यावेळी जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, प्रवीण सावळे, अजय मोरया, नीलेश भेंडे, अश्विनी झोड, शैलेश शिरभाते, विकास नागदिवे आदी उपस्थित होते.