हायरिस्क व्यक्ती, संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी नवी चार केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:35 AM2021-02-20T04:35:46+5:302021-02-20T04:35:46+5:30
अमरावती : महानगरात कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने अमरावती, बडनेरा शहरात हायरिस्क व्यक्ती, संशयित रुग्णांच्या ...
अमरावती : महानगरात कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने अमरावती, बडनेरा शहरात हायरिस्क व्यक्ती, संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी नवी चार केंद्रे स्थापन केली आहेत. या चारही केंद्रांवर लवकरच ॲन्टिजेन, आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.
कोविड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सहवासात आणि संपर्कात आलेल्या हायरिस्क व्यक्तींच्या संशयित रुग्णांची रॅपिड ॲन्टिजेन, आरटी-पीसीआर चाचणी करण्यासाठी स्थानिक नवाथे स्थित महापालिका आयसाेलेशन दवाखाना, नेहरू मैदान येथील महापालिका शाळा या दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, राज्य शासनाने कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले असून, महापालिका प्रशासनाने नव्याने चार केंद्रे स्थापन केली आहेत.
--------------------
ही असतील नवी चार चाचणी केंद्रे
- विलासनगर येथील महापालिका शाळा क्रमांक १७
- नागपुरी गेट येथील महापालिका शाळा
- बडनेरा नवी वस्ती पोलीस ठाण्याच्या मागे महापालिका शाळा
- दस्तुरनगर येथे विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय