४५ दिवसांत सर्वाधिक ४४९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:15 AM2021-02-16T04:15:38+5:302021-02-16T04:15:38+5:30
अमरावती : नवीन वर्षात जानेवारी ते १५ फेब्रुवारी या ४६ दिवसांत सोमवारी सर्वाधिक ४४९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, ...
अमरावती : नवीन वर्षात जानेवारी ते १५ फेब्रुवारी या ४६ दिवसांत सोमवारी सर्वाधिक ४४९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, उपचारादरम्यान चार रूग्णाना जीव गमवावा लागला. आतापर्यंत कोरोना मृतांची संख्या ४३९ एवढी झाली असून, संक्रमित रूग्ण संख्येने २५ हजार ७४३ वर उच्चांक गाठला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड ॲन्टीजेन तपासणी आणि विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार सोमवारी ४४९ पॉझिटिव्ह आढळून आहे. गत पाच दिवसांत तीन शतकी संक्रमित रूग्णांची सतत आकडेवारी नोंद होत आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका यंत्रणेने नागरिकांनी त्रिसूत्रीचे कोटेकोरपणे पालन करावे, यासाठी विविध उपाययोजनांची लांबलचक यादी जाहीर केली आहे. मात्र, कोरोना संक्रमितांची आकडेवारी कमी होताना दिसून येत नाही. पॉझिटिव्ह संख्या कमी करणे आता प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरणारे आहे. कोरोना का वाढला, याबाबत प्रशासन ठोस कारण देऊ शकत नाही.
सोमवारी एकूण दाखल रूग्ण ५०९
बरे होऊन घरी गेले - ३३६
गृह विलगीकरण :
महापालिका- ३३६
ग्रामीण -४८०
ॲक्टिव्ह रूग्ण - १२१४
मृत्यू दर : १.७१श
एकूण नमुने : १ लाख ९५ हजार ८७०
-------------------
पाच दिवसात १२ रूग्णांचाे बळी
११ फेब्रुवारी- १
१२ फेब्रुवारी- ३
१३ फेब्रुवारी- १
१४ फेब्रुवारी- ३
१५ फेब्रुवारी् - ४
---------------