विहिगाव येथे अंजनगाव तालुक्यातील सर्वाधिक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:16 AM2021-09-06T04:16:27+5:302021-09-06T04:16:27+5:30
अंजनगाव सुर्जी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत ग्राम विहिगाव बुद्रुक येथे कापूसतळणी आरोग्य उपकेंद्रातर्फे एकूण ५४० जणांना कोरोना प्रतिबंधक ...
अंजनगाव सुर्जी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत ग्राम विहिगाव बुद्रुक येथे कापूसतळणी आरोग्य उपकेंद्रातर्फे एकूण ५४० जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील लसीकरणाची हा सर्वाधिक संख्या असल्याचे आरोग्य विभागाने कळविले. लसीकरणासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायतचे कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. सकाळी १० पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आले. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व आशा वर्कर यांचे सरपंच जयश्री पोटदुखे, उपसरपंच भैयासाहेब अभ्यंकर व ग्रामपंचायत सदस्यांनी कौतुक करून आभार मानले. लसीकरणाकरिता डॉ. सुधीर डोंगरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. सागर शेळके, डॉ. श्रीहरी मोराळे, डॉ. निकिता रोकडे, आरोग्य सेवक दिलीप खोबरागडे, किशोर डांगे, भास्कर होरे, शंकर हरड, आरोग्य सहायक सुधीर पवार, आरोग्य सेविका मंगला तायडे, ज्योत्स्ना वैराळे, संगीता वानखडे, आशा सेविका रजनी पोटदुखे, शालू अभ्यंकर, अर्चना तराळे, अक्षय काळपांडे, उमेश मुंडोकार, विजय इटकरे यांनी अथक परिश्रम घेतले.