'स्ट्राँग रुम' परिसरात हायअलर्ट

By admin | Published: October 18, 2014 12:47 AM2014-10-18T00:47:26+5:302014-10-18T00:47:26+5:30

अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी रविवारी सकाळी ७ वाजतापासून विलासनगर परिसरातील शासकीय धान्य गोदामात ...

Highlight in the 'Strong Room' area | 'स्ट्राँग रुम' परिसरात हायअलर्ट

'स्ट्राँग रुम' परिसरात हायअलर्ट

Next

अमरावती : अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी रविवारी सकाळी ७ वाजतापासून विलासनगर परिसरातील शासकीय धान्य गोदामात होणार असून त्याकरिता स्ट्राँग रुम परिसरात पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी स्ट्राँग परिसरातील पोलीस सुरक्षेची पाहणी करुन सुरक्षेबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
नागरिकांना तसेच उमेदवारांनाही मतमोजणीनंतर हाती येणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. अमरावती, बडनेरा मतदारसंघातील मतमोजणी विलासनगरातील शासकीय धान्य गोदामात करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत निर्विघ्नपणे पार पडावी, याकरिता पोलीस विभाग सुसज्ज आहे. विलासनगरातील शासकीय गोदाम परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. स्ट्राँग रूम परिसरातील बाहेरच्या घडामोडींवर पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. मतमोजणीच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पोलीस विभाग सज्ज झाला आहे. मतमोजणीच्यावेळी विलासनगर मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येईल. गोदामाच्या प्रवेशद्वारावर २० जवान तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय पोलीस दल व एसआरपीएफचे जवान गोदाम परिसराची देखरेख करीत आहेत. या व्यतिरिक्त स्टाँग रुमच्या सुरक्षेसाठी २ एसआयपीएफचे सेक्शन ( प्रत्येकी २० जवान), आरपीएसएफचे एक प्लॅटुन, ३ मोर्चे उभारणी, २ टॉवरवर दोन जवान परिसराच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आले आहेत. अशा तगड्या बंदोबस्तामध्ये दोन मतदारसंघांची मतमोजणी होईल.
शहरातील वाहतुकीत बदल
अमरावती : विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रियेकरिता शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विलास नगरातील शासकीय धान्य गोदामात होणाऱ्या मतमोजणीच्या दृष्टीने त्या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. चौधरी चौक ते शेगाव नाका चौक या मार्गावरील सिंधी चौक ते कॉटन मार्केट चौकपर्यंत दोन्ही बाजूने वाहतूक करणाऱ्या वाहनांना १९ आॅक्टोबर सकाळी ६ ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रवेश बंदी राहील, असे आदेश पोलीस उपायुक्त बी. के. गावराने यांनी पारित केले आहे. पर्यायी मार्ग म्हणून चौधरी चौकाकडून शेगाव नाक्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने चौधरी चौक, बाबा कॉर्नर मार्ग किंवा खत्री मार्केट ते इर्विन चौक मार्गाने आगमन करतील. शेगाव नाका ते चौधरी चौकाकडे येणारी वाहने ही शेगाव नाक्यावरुन पंचवटी चौक किंवा कठोरा नाका मार्गाने ये-जा करतील अशी अधिसूचना पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे. या अधिसूचनेचे उल्लघंन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत १९८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: Highlight in the 'Strong Room' area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.