अपहरणाचा कट उधळला
By admin | Published: July 1, 2014 01:15 AM2014-07-01T01:15:06+5:302014-07-01T01:15:06+5:30
शहरातील एका श्रीमंताच्या मुलाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याची योजना आखणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी त्यापूर्वीच अटक करुन अपहरणाचा कट उधळून लावल्याने
एक कोटीची खंडणी : अनर्थ टळला, पोलीस उपायुक्तांची माहिती
अमरावती : शहरातील एका श्रीमंताच्या मुलाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याची योजना आखणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी त्यापूर्वीच अटक करुन अपहरणाचा कट उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. दुचाकी चोरीप्रकरणी अटकेतील आरोपींनी पोलिसांना शहरातील एका श्रीमंताच्या मुलाच्या अपहरणाची योजना आखली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
अब्दुल इम्रान अब्दुल सलीम (२९) हा भारतीय महाविद्यालयात बी. कॉम तृतीय वर्ष व अश्विन गणेश वाघमारे (२२ दोन्ही रा. बिच्छु टेकडी) हा विमलाबाई देशमुख महाविद्यालय (रुलर) येथे इयत्ता १२ वीचा विद्यार्थी आहे. या दोघांना काही महिन्यांपूर्वी गाडगेनगर पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर जामीनावर ते सुटले होते. दरम्यान या टोळीचा मास्टर मार्इंड असलेला अब्दुल इम्रान व अश्विनने लहान- मोठ्या चोरी करण्यापेक्षा मोठा हात मारण्याचा कट रचला.
कटातील साथीदाराचा शोध सुरु
या कटात आणखी एक साथिदार सहभागी होता. त्यांनी शहरातील एका श्रीमंत पित्याच्या मुलाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी शहरातून दोन दुचाकी वाहने चोरी केली. परंतु त्यांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींचे खरे रुप पोलिसांपुढे आले. त्यांनी पोलिसांना तीन घरफोडींसह शहरातील ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचे अपहरण करणार होते त्याचे नाव व योजना सांगितली. हे चोरटे वेळीच हाती लागल्याने शहरात मोठी घटना टळल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
मेडिकलमधून खरदी केले गुंगीचे औषध
श्रीमंताच्या मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याला रडू येऊ नये यासाठी अब्दुल इम्रानने त्याला बेशुद्ध करण्यासाठी मेडिकलमधून क्लोरोफॉर्म हे गुंगीचे औषध खरेदी केले होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली