६९८ वर्षांपूर्वीचे इतिहासकालीन नाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:35+5:30

यामधील एक नाणे ६९८ वर्षांपूर्वीचे आहे. हे नाणे निजामशाहीतील असून, त्यावर सन १३२२ असे अंकित आहे. निजामशाहीत हे चांदीचे एक रुपयाचे नाणे १३२१ मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्याच्या एका बाजूस मक्का येथील मशिदीचे, तर समोरील बाजूला मिनारचे चिन्ह आहे. या मिनारच्या चारही बाजूला अरबी भाषेतील मजकूर आहे. परंतु, शहरात अरबी भाषा कोणालाही अवगत नसल्याने या लिखाणाचा अर्थ कळू शकला नाही.

Historical coin of 698 years ago | ६९८ वर्षांपूर्वीचे इतिहासकालीन नाणे

६९८ वर्षांपूर्वीचे इतिहासकालीन नाणे

googlenewsNext
ठळक मुद्देचांदूर बाजारमध्ये जतन : लक्ष्मीपुजनात मान

सुमित हरकूट।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : तालुक्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबाकडे इतिहासकालीन नाणे आहेत. त्यांच्याकडे असलेली ही पारंपरिक वडिलोपार्जित नाणी फक्त लक्ष्मीपूजनालाच बाहेर काढली जातात. अन्य वेळी ही नाणी तिजोरीत बंद असतात.
यामधील एक नाणे ६९८ वर्षांपूर्वीचे आहे. हे नाणे निजामशाहीतील असून, त्यावर सन १३२२ असे अंकित आहे. निजामशाहीत हे चांदीचे एक रुपयाचे नाणे १३२१ मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्याच्या एका बाजूस मक्का येथील मशिदीचे, तर समोरील बाजूला मिनारचे चिन्ह आहे. या मिनारच्या चारही बाजूला अरबी भाषेतील मजकूर आहे. परंतु, शहरात अरबी भाषा कोणालाही अवगत नसल्याने या लिखाणाचा अर्थ कळू शकला नाही.
त्यांच्याकडील एकूण १६ नाण्यांमध्ये निजामशाहीतील एका नाण्यासह दोन नाणी १८४० मधील व्हिक्टोरिया राणीचा ठसा असलेली आहेत. एक नाणे १८८२ मधील इंडियन पोर्तुगिज रुपयाचे आहे. आठ नाणी १९१३, १९४४, १९४७ ची ब्रिटिशकालीन जॉर्ज फोर्थ, जॉर्ज फिप्थ यांच्या कार्यकाळातील एक रुपयाची चांदीची नाणी आहेत. तसेच सन १९३९, १९४३, १९४४ मधील आठआणे, एक आणा अशी ऐतिहासिक नाणी आहेत. ही नाणी वडिलोपार्जित पूजेत असल्यामुळे अद्यापही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Historical coin of 698 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास