इतिहासाची साक्ष खोलापुरी गेट ...
By admin | Published: November 26, 2015 12:12 AM2015-11-26T00:12:44+5:302015-11-26T00:12:44+5:30
इ.स. पूर्व १५२० मध्ये वऱ्हाडचा स्वतंत्र राजा दर्या इमाज शहा यांच्या कार्यकाळात दर्यापूरचे खोलापुरीगेट बांधल्याचा इतिहास आढळतो.
Next
इतिहासाची साक्ष खोलापुरी गेट ... इ.स. पूर्व १५२० मध्ये वऱ्हाडचा स्वतंत्र राजा दर्या इमाज शहा यांच्या कार्यकाळात दर्यापूरचे खोलापुरीगेट बांधल्याचा इतिहास आढळतो. गेटच्या बाहेर मोगलशाही राज्य तर गेटच्या आत आदिलशाही सरदारांचे राज्य तत्कालीन काळात होते, अशी साक्ष इतिहास सांगतो. जुने दर्यापूर ऐतिहासिक असून याच प्रवेशव्दारापासून खोलापूरला जाण्यासाठी रस्ता असल्याने त्याचे नाव खोलापुरीगेट असे ठेवण्यात आले. आमदार निधीतून व नगराध्यक्ष वंदना राजगुरे यांच्या निधीतून या गेटचे सौंदर्यीकरण झाले.