सीमेंट रोडचा मार, महावितरणमध्ये कार्यरत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:49 AM2023-07-14T10:49:23+5:302023-07-14T10:50:47+5:30

रस्त्यावरील फलकाला धडकले वाहन, निंभीनजीक अपघात

Hit by cement road, death of motorcyclist working in Mahavitaran | सीमेंट रोडचा मार, महावितरणमध्ये कार्यरत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सीमेंट रोडचा मार, महावितरणमध्ये कार्यरत दुचाकीस्वाराचा मृत्यू

googlenewsNext

मोर्शी (अमरावती) : शहरातील गुरुदेवनगरस्थित २८ वर्षीय युवकाची दुचाकी रस्त्याची दुरुस्ती सुरू असल्याचे दर्शविणाऱ्या फलकाला धडकल्यानंतर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्यावर पडून त्याचा मृत्यू झाला. निंभीनजीक मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला. वृषभ भोयर असे मृताचे नाव आहे. ते महावितरणला वरूड तालुक्यातील ढगा येथे कार्यरत होते.

१२ जुलै रोजी एमएच २७ डीजी ६०५० क्रमांकाच्या दुचाकीने ते काही कामानिमित्त अमरावतीला गेले होते. रात्री उशिरा मोर्शीकडे परत येत असताना निंभीनजीक असलेल्या वळण रस्त्यावर रात्री १०.३० च्या सुमारास सिमेंट रोड खोदून सुरू असलेल्या कामावरील फलकावर त्यांची दुचाकी आदळली. यानंतर डोक्याला व तोंडाला सिमेंट रोडचा जबर मार बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकी फलकाला धडकल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असावी. यातच वृषभ दुचाकीवरून रस्त्यावर कोसळले, असा कयास लावला जात आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या या युवकाची माहिती शिरखेड पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर १३ जुलै रोजी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडले.

सिमेंट रस्त्याला भेगा

नांदगाव पेठ ते पांढुर्णा या सिमेंट रोडचे काम जवळपास पूर्णत्वास गेले असताना केवळ तीन वर्षांच्या कालावधीतच या सिमेंट रोडला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. कित्येक जागी अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे या रोडवर जणूकाही अपघाताची मालिकाच सुरू आहे.

Web Title: Hit by cement road, death of motorcyclist working in Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.