शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:46+5:302020-12-04T04:33:46+5:30
फोटो मेलवर दखने नावाने सेव आहे अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने ...
फोटो मेलवर दखने नावाने सेव आहे
अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांवर होत असलेल्या दडपशाहीचा यावेळी निषेध करण्यात आला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. शेतकरी विराेधी तीनही कायदे मागे घेण्यात यावे. डॉ.स्वाभिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समीतीमधील घटक संघटनांना सरकारने चर्चेसाठी बोलवावे आदी मागण्या निवदेनात मांडण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय कौसिन्ल सदस्य अशोक सोनारकर, जिल्हा सचिव लक्ष्मण धाकडे, बाळासाहेब कुटेमाटे, किसान सभेचे जे.एम. कोठारी, चंद्रकांत बानुवाकोडे, शेतकरी मजूर युनियनचे सुनील घटाळे, भाकपचे शरद मंगळे, निळकंठ ढोके, एआयवायएफचे हिमांशु अतकरे, सागर दुर्योधन, दीपक विधळे आदी उपस्थित होते.