पीक कर्जासाठी जिल्हा उपनिबंध कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:00+5:302021-04-30T04:17:00+5:30
शेतकऱ्यांचे निवेदन; न्याय देण्याची मागणी अमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या ...
शेतकऱ्यांचे निवेदन; न्याय देण्याची मागणी
अमरावती: चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेकडून टाळाटाळ केली जात आहे.त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी कर्जासाठी २९ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधक यांचेकडे धाव घेवून तातडीने कर्ज देण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
आसेगाव पूर्णा येथील जिल्हा बॅकेच्या शाखेकडून स्थानिक शेतकरी पीक कर्ज घेतात.सदर शेतकऱ्यांनी आपल्याकडील कर्जाची परतफेडही नियमितपणे करीत आहेत.असे असतांनाही सन २०२१-२२ करीता संबंधित बॅकेकडून कर्ज मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.तर सोसायटी मार्फत कर्ज घ्यावे असे फर्मान सोडले जात आहे.देशभर कोरोना संकट ओढवले आहे. देशात अन्नधान्य निर्मिती मध्ये स्वयंसिध्द असलेल्या शेतकऱ्यांनीचे बनविले आहे.मात्र ज्या गावातील सेवा सोसायटी अवसायनात निघाली तेथील शेतकऱ्यांना बॅकशाखेव्दारे सहजरित्या मिळणाऱ्या पीक कर्जावर गंडातरण आणून वेठीस धरले जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यावरील हा अन्याय दूर करून तातडीने पीक कर्जाचा पुरवठा करावा याकरीता संबंधित बॅकेला आदेश द्यावेत अशी मागणी जिल्हा उपनिबंधक यांचे कडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे,संतोष महात्मे यांचे नेतुत्वात शेतकरी मेघश्याम करडे,जनार्धन बोबडे,सुभाष जामनेकर,पंचफुला बढे,जाबीर शहा,चाॅंद शहा,गफूर शहा,मेहबुब शहा,मधूकर इंगळे,राजेश इंगळे,मधूकर गवई,वासुदेव गवई,विलास वाटाणे,नंदू शिरभाते,उत्तम शिरभाते,माधूरी शिरभाते,पंजाब पुनसे,मधुदास कैथवास,हरिभाऊ राजूरकर,राजेंद्र गवई,गोपाल पाटील आदीनी डिडिआय यांचेकडे केली आहे.