रेतीचोरांकडून धारणीच्या नायब तहसीलदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:26 PM2019-01-04T22:26:25+5:302019-01-04T22:26:42+5:30

येथील नायब तहसीलदारास रेतीचोरांकडून मारहाण करण्यात आली. धावत्या ट्रॅक्टरमधून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना तालुक्यातील सोनाबर्डी रेतीघाटाजवळ ३ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. धारणी पोलिसांनी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३५३, ३३२, ३६७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Hit the nayab Tehsildar of the clutches from the sage | रेतीचोरांकडून धारणीच्या नायब तहसीलदाराला मारहाण

रेतीचोरांकडून धारणीच्या नायब तहसीलदाराला मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देसोनाबर्डीची घटना : जीव वाचविण्यासाठी धावत्या ट्रॅक्टरमधून उडी

धारणी : येथील नायब तहसीलदारास रेतीचोरांकडून मारहाण करण्यात आली. धावत्या ट्रॅक्टरमधून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना तालुक्यातील सोनाबर्डी रेतीघाटाजवळ ३ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ च्या सुमारास घडली. धारणी पोलिसांनी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३५३, ३३२, ३६७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
आदिनाथ तानाजी गांजरे (३२) असे नायब तहसीलदाराचे नाव आहे. धारणी तहसीलमध्ये निवडणूक विभागात कार्यरत गांजरे हे ३ जानेवारीस सहकाऱ्यांसह सोनाबर्डी रेतीघाटाची पाहणी करण्यास गेले होते. त्यावेळी एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरली जात असल्याचे निदर्शनास आले. गांजरे यांनी संबंधित चालकास वाहन धारणी तहसील कार्यालायात नेण्यास बजावले. त्यावेळी चालकाने रेती जागीच रिकामी केली व पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गांजरे ट्रॅक्टरवर चढले. त्यावेळी आरोपी चालक व त्याच्या सहकाºयांनी गांजरे यांना मारहाण केली. गांजरे हे ट्रॅक्टरवर असतानाच आरोपी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन पळाले. अखेर एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर ट्रॅक्टरचा वेग कमी झाला. त्यावेळी गांजरे यांनी उडी घेतली.

अनोळखी चालक पळण्याच्या बेतात असताना मी ट्रॅक्टरवर चढलो व तो तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. त्याने मध्यप्रदेशकडे ट्रॅक्टर पळविला. यामुळे मला चालत्या ट्रॅक्टरमधून उडी घ्यावी लागली.
- आदिनाथ गांजरे, नायब तहसीलदार

नायब तहसीलदारांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीच्या छायाचित्रावरून त्याची ओळख पटविली जाईल. तपास आरंभला आहे.
- विलास कुलकर्णी
पोलीस निरीक्षक, धारणी

Web Title: Hit the nayab Tehsildar of the clutches from the sage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.