४६ हजार जणांची एचआयव्ही तपासणी, ३१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:13+5:302021-08-24T04:17:13+5:30
कोरोना काळातही एचआयव्ही विभागासह संलग्नित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते जून महिन्यात जिल्ह्यातील ४६४०९ जणांचे रक्त नमुने गोळा केले. ते ...
कोरोना काळातही एचआयव्ही विभागासह संलग्नित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते जून महिन्यात जिल्ह्यातील ४६४०९ जणांचे रक्त नमुने गोळा केले. ते पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत पाठविले. त्यातील ३० पुरुष व एक गरोदर माता पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना एआयटी सेंटरला लिंक केले असून, औषधोपचारदेखील नियमित सुरू केले असल्याची माहिती एचआयव्ही विभागाचे प्रमुख अजय साखरे यांनी दिली.
कोट
यंदा चार मातांची बाळांना जन्म दिला. त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू आहे. ते निगेटिव्ह की, पॉझिटिव्ह याची शहानिशा करण्यासाठी तीन बाळांचे नमुने राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेला पाठविले आहे.
- डॉ. अजय साखरे, जिल्हा एड्स नियंत्रण विभागप्रमुख, इर्विन रुग्णालय
बॉक्स
जिल्हानिहाय मानांकन टक्केवारी
अमरावती ९९.७, हिंगोली ९८.१ बुलडाणा ९८, अकोला ९६.७, धुळे ९५.१, जळगाव ९४.३, जालना ९४.३, लातूर ९३.१, बीड ९२.६, भंडारा ९२.३, नंदूरबार ९१.७, यवतमाळ ९१.४, अहमदनगर, ९०.९, गोंदिया ९०.७, रायगड ९०.६, सातारा ८९.९, नाशिक ८९.१, सोलापूर ८७.९, सांगली ८७.४, ठाणे ८५.१, परभणी ८५, औरंगाबाद ८३.८, पुणे ८३.२, कोल्हापूर ८०.९, वाशिम ७९.६, नांदेड ७५.५, सिंधुदुर्ग ७४.७, गडचिरोली ७३.३, रत्नागिरी ७३.२, उस्मानाबाद जिल्ह्याला ७२.३ टक्के मानांकन प्राप्त झालेले आहे.