धारणीत अतिवृष्टी; जनजीवन विस्कळित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:40+5:302021-07-24T04:10:40+5:30
फोटो २३एएमपीएच०६ कॅप्शन - सिपना नदी अशी दुथडी भरून वाहत आहे. कॉमन अमरावती : दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या ...
फोटो २३एएमपीएच०६ कॅप्शन - सिपना नदी अशी दुथडी भरून वाहत आहे.
कॉमन
अमरावती : दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने मेळघाटातील जनजीवन विस्कळित झाले आहे. २४ तासात धारणी तालुक्यात ८१.६ मिमी अशा अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २८.९ मिमी पाऊस पडला. या पावसाने एकूण ३२ गावे बाधित झाल्याची नोंद महसूल विभागाने घेतली आहे. त्यात ४६ घरांचे नुकसान झाले असून, २६२ हेक्टरवरील पिकांची हानी झाली.
गुरुवारी चिखलदरा तालुक्याने, तर शुक्रवारी धारणी तालुक्याने अतिवृष्टीचा कहर अनुभवला. धारणी तालुका मुख्यालयापासून ५० किमी अंतरावरील राणीगाव घाटात दरड कोसळली. त्यामुळे सुसर्दा ते धारणी हा मार्ग बंद झाला. तत्पूर्वी गुरुवारी सिपना नदीला महापूर आल्याने धारणी व दिया भागातील ३५ गावांचा संपर्क तुटला. या मुसळधार पावसामुळे मेळघाटातील बीएसएनएल सेवा कोलमडली. चिखलदरा तालुक्यातील अनेक मार्ग सलग दुसऱ्या दिवशीदेखील बंद होते. दुसरीकडे मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मेळघाटात जलजन्य आजाराची भीती व्यक्त करण्यात येत आहे.