तृतीयपंथीयांचे जिल्हाकचेरीसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:51+5:30
लाठीहल्लाच्या विरोधात २५ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली असताना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट राष्ट्रीय ध्वजाने मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाऐवजी त्याला रिवार्ड देण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच तृतीयपंथीयांना बडनेरा स्थित जयहिंद चौकालगतच्या जागेत घरकूल बांधून देण्यात यावे, त्यांच्या नावाने पीआर कार्ड देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत.
अमरावती : सीएए कायद्याच्या विरोधात बंदची हाक देणाऱ्या वंचित बहुजन अघाडीच्या कार्यकर्त्यांवर २४ जानेवारी रोजी गाडगेनगर ठाणेदार व पोलिसांद्वारा लाठीहल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ तृतीयपंथीयांतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे देण्यात आले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यामध्ये लाठीहल्लाच्या विरोधात २५ जानेवारी रोजी पोलिसांत तक्रार दिली असताना कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट राष्ट्रीय ध्वजाने मारहाण करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाऐवजी त्याला रिवार्ड देण्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच तृतीयपंथीयांना बडनेरा स्थित जयहिंद चौकालगतच्या जागेत घरकूल बांधून देण्यात यावे, त्यांच्या नावाने पीआर कार्ड देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. यावेळी सिद्धार्थ गायकवाड, अलीम पटेल, प्रमोद इंगळे चरणदास निकोसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे निमंत्रक समाधान वानखडे, आपचे किरण गुडधे, बौद्ध महासभेचे विजय चोरपगार, राहुल मोहोड, तृतीयपंथीय नेत्या वहीदा नायक, मंगला, आम्रपाली, प्रिया गुरू नायक, छोटी, राजकुमारी यांच्यासह सुमित्रा रामटेके, सुनीता वानखडे, महानंदा इंगळे, मंगला निंबाळकर यांच्यासह आंबेडकरी समूहातील व संघटनेचे पदाधिकारी झाले होते.