जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शेतकरीविरोधी कायद्यांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:10 AM2021-06-20T04:10:29+5:302021-06-20T04:10:29+5:30
जिल्हा काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने १९ जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या ...
जिल्हा काँग्रेसचे आंदोलन; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
अमरावती : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने १९ जून रोजी खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरीविरोधी केंद्रीय कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात मोदी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
केंद्रातील भाजप सरकारने घेतलेल्या अनेक तुघलकी निर्णयांमुळे देशातील जनता भरडली जात असून, महागाईने गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. एकीकडे देशात प्रचंड अराजकता माजली आहे, तर जगभरात बदनामी झाली. या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी खा. राहुल गांधी यांच्या विचारांची व दूरदृष्टीची गरज असल्याचे मत बबलू देशमुख यांनी यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
देशातील लाखो युवक मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बेरोजगार झाले आहेत. देशातील महागाई वाढत आहे. अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले आहे. अनेक वेळा खा. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला पत्र लिहून उपाययोजना सुचविल्या, पण केंद्राने त्या अव्हेरल्या, असेही बबलू देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी आ. बळवंत वानखडे यांनीही आंदोलकांना संबोधित केले.
एक देश - एक बाजारपेठ, करार शेती व्यवसाय, जीवनावश्यक वस्तू सुधारणा या २०२० मधील तिन्ही कायद्यांच्या प्रपत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी शेतकर्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘माझी मशाल माझा दणका - जाळी या मोदीच्या पापाची लंका’ असे नारे दिले. आंदोलनात बाळा साहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, दयाराम काळे, जयंत देशमुख, प्रदीप देशमुख, छाया दंडाळे, महेंद्र गैलवार, हरीभाऊ मोहोड, संजय लायदे, परीक्षित जगताप, किशोर देशमुख, सिद्धार्थ बोबडे, श्रीकांत झोडपे, सतीश धोंडे, अरविंद लंगोटे, बाबूराव जवंजाळ, अरुण दाते, श्रीकृष्ण सरदार, विशाल भट्टड, रवींद्र खवले, नीरज कोकाटे, अब्दुल नईम, शशांक श्रीराव, सलामुद्दीन उर्फ सल्लू,भागवत खांडे, समाधान दहातोंडे, मोहन सिंगवी, बबलू इनामदार, वीरेंद्र जाधव, किशोर खडसे, रत्नाकर करुले, मुमताज देशमुख, दिलीप डाखोरे, शिवाजी देशमुख, राजेंद्र नागपुरे, संजय बेलोकर, अमोल देशमुख, पंकज वानखडे, राजू कुरेशी उपस्थित होते.