होळी, रंगपंचमीवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:16+5:302021-03-28T04:13:16+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर घरात राहा आणि सुरक्षित राहा, मूलमंत्र जपण्याची गरज निर्माण ...

Holi, coronation on Rangpanchami | होळी, रंगपंचमीवर कोरोनाचे सावट

होळी, रंगपंचमीवर कोरोनाचे सावट

Next

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर घरात राहा आणि सुरक्षित राहा, मूलमंत्र जपण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणारी होळी आणि रंगपंचमी यंदा कोरोनाच्या सावटाखाली साजरी होणार आहे. नागरिकांनी एकत्र न येता घरच्या घरीच शिमगा साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातही बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गर्दी जमवून सण समारंभ साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. गर्दी करणारे सण समारंभ साधेपणाने घरच्या घरी साजरे करण्यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. गर्दी जमून यावर तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. नागरिक मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याने संसर्ग वाढू लागला आहे. जिल्ह्यात राज्यात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. जास्तीत जास्त मोठी होळी पेटविण्यासाठी गावागावांत विविध मंडळांची चढाओढ लागते. लाकडे, गोवऱ्या गोळा केल्या जातात. अनेक जण तर होळीसाठी गोवऱ्या वाटपाचा उपक्रम राबवितात. गावात काही ठराविक ठिकाणी मोठी होळी पेटविण्यात येते. त्या परिसरात सर्व नागरिक एकत्र येऊन होळीला नैवेद्य दाखवतात. नारळ अर्पण करून शिमगा साजरा करतात. परंतु, यावर्षी होळीवर कोरोनाचे सावट घोंगावत आहे. घराबाहेर पडताना संसर्गाची धास्ती वाढत आहे. त्यामुळे होळी सर्वप्रथम परंपरेनुसार घरच्या घरी साजरी करणे गरजेचे आहे. घरोघरी प्रतिकात्मक होळी पेटवून पूजन केले जाणार आहे. दरम्यान शहरांमध्ये होळी रंगपंचमी खेळली जाते. परंतु यावर्षी होळीवर कोरोना संसर्गाचा रंग चढल्याने रंगपंचमीवरही मर्यादा आल्या आहेत.

Web Title: Holi, coronation on Rangpanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.