कर्जमाफ ीच्या अध्यादेशाची होळी
By admin | Published: June 22, 2017 12:03 AM2017-06-22T00:03:48+5:302017-06-22T00:03:48+5:30
कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
काँग्रेसचे आंदोलन : चांदूरबाजार, तिवसा, अंजनगाव व दर्यापुरात कार्यकर्ते एकवटले
अमरावती : कर्जमाफीला तत्वत: व निकषांच्या आधारे मान्यता, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा अध्यादेश शासनाने काढला आहे. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून सरकारने कर्जमाफ ीचा केवळ ‘फ ार्स’ चालविल्याचा आरोप करीत काँग्रेसने तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर व अंजनगावात बुधवारी आंदोलन केले. कर्जमाफीचा जीआर जाळून शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.
तिवसा : तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलन करून शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. भाजप शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शासनविरोधी घोषणा दिल्यात.
बँकेने अद्याप शेतकऱ्यांना पीककर्ज दिलेले नाही. सुकाणू समितीच्या बैठकी सुरूच आहेत. शेतकरी संप थांबावा, यासाठी केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप यावेळी केला. तिवसा येथे नाफेडमार्फत अनेक शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून तूर खरेदी झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, असा आरोपही करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, वैभव वानखडे, सागर राऊत, रामदास मेहत्रे, नरेंद्र विघ्ने, दीपक पावडे, उपस्थित होते.
चांदूरबाजार : येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने कर्जमाफी व तत्काळ दहा हजार रूपये देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयातील अटी व निकषांमुळे सर्वसाधारण व गरीब शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासननिर्णयाचा विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली. सोबतच एक निषेध निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी बाजार समिती सभापती अरविंद लंगोटे, शिवाजी बंड, किशोर देशमुख, बाबूभाई इनामदार, बाबूराव जवंजाळ, छोटू देशमुख, विलास गांजरे, भय्या काळे, विशाल बेले, प्रवीण वाघमारे, नंदू भोयर,संजय म्हाला, प्रमोद घुलक्षे नजीम बेग, भाई देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दर्यापूर : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अमोल कुंभार यांना शासनाच्या अध्यादेशाचे निवेदन देत तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, अभिजीत देवके, सुनील गावंडे बबनराव देशमुख, शशांक धर्माळे, साहेबराव बदे, राजिकभाई, राजू वानखडे, अविनाश ठाकरे, केशव भडांगे, दिलीप चव्हाण उपस्थित होते.
अंजनगाव सुर्जी : येथील तहसील कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष राजेंद्र आडे यांच्या नेतृत्वात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. हरिभाऊ बहिरे, सत्यविजय निपाने, हिम्मत ढोक, विनोद देशमुख, मुरलीधर तुरखडे, सुभाष चौखंडे, ज्ञानेश्वर मुरतकर, दिलीप देशमुख, रवि बोंदरे, फरहाज भाई, एकनाथ निचळ, नितीन निमकाळे, प्रफु ल्ल ढोक, दीपक हरणे, राहुल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.