राणा दाम्पत्यांची आदिवासींसमवेत होळी

By admin | Published: March 26, 2016 12:02 AM2016-03-26T00:02:43+5:302016-03-26T00:02:43+5:30

गत सात वर्षांपासून मेळघाटच्या आदिवासी भागात होळी उत्सव साजरा करण्याची परंपरा यावर्षी देखील आ. रवी राणा, नवनीत राणा यांनी कायम ठेवली.

Holi with the tribes of Rana couple of tribals | राणा दाम्पत्यांची आदिवासींसमवेत होळी

राणा दाम्पत्यांची आदिवासींसमवेत होळी

Next

अमरावती : लोकमत सखीमंचच्या संस्थापिका ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक अभियंता भवन येथे २२ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाभीजींचा जीवनपट उलगडण्यात आला.
ज्योत्स्नाभाभी या शक्ती व भक्तीच्या एकत्र अनुष्ठानाचे प्रतिक होत्या. त्यांनी सखीमंचच्या माध्यमातून महिलाशक्ती एकजूट केली. आज सखीमंचचा वटवृक्ष झालाय. भाभीजींचे हे कर्तृत्व समाजातील इतर अनेक स्त्रियांना प्रोत्साहन आणि बळ देणारे आहे, असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमादरम्यान अनेक भक्तीगिते व भजनांचे सादरीकरण करून भाभीजींना स्वरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन, आयुर्विमाच्या प्रशासकीय अधिकारी स्वाती सहस्त्रबुध्दे, नगरसेविका अर्चना इंगोले, नलिनी थोरात, प्रसिध्द गायिका रोशनी दर्जी, गायक सुरेश दंदे, प्रवीण जोंधळे यांनी भावसुमनांजली अर्पण केली. उपरोक्त गायकांना तबल्यावर नीलेश पांडे, आॅक्टोपॅडवर वीरेंद्र गावंडे यांनी उत्तम साथ दिली. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते ज्योत्स्नाभाभींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर करण्यात आली. गायिका रोशनी दर्जी व सुरेश दंदे यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. महिलांनी देखील ताल धरला होता. एकदंताय.. वक्रतुंडाय या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर ओम नम: शिवाय, चदरिया छिनी रे, यशोमती मैया से, राम का गुणान करिये, मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे, मुकुंदा-मुकुंदा, छोटी-छोटी गैया यांसारखी रसाळ भजने सादर करण्यात आलीत. कार्यक्रमात सखीमंचच्या सदस्य महिला, युवा नेक्स्ट आणि बाल विकासमंचच्या सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती. संचालन स्वाती बडगुजर यांनी केले. सखीमंचद्वारे ज्योत्स्ना भाभीजींच्या स्मृती जागविण्यात आल्यात.

Web Title: Holi with the tribes of Rana couple of tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.