होमिओपॅथी ही समग्र चिकित्सा पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:23 AM2018-04-10T00:23:27+5:302018-04-10T00:23:27+5:30

होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे जनक डॉ. सॅमुअल क्रिस्टिअन हेनिमन यांचा जन्म १० एप्रिल १७५५ मध्ये झाला. हा दिवस विश्व होमिआॅेपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. होमिओपॅथी डॉक्टरांच्यावतीने मंगळवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Homeopathy is a holistic medical practice | होमिओपॅथी ही समग्र चिकित्सा पद्धती

होमिओपॅथी ही समग्र चिकित्सा पद्धती

googlenewsNext
ठळक मुद्देमानसिक, शारीरिक पातळीचा विचार : शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे जनक डॉ. सॅमुअल क्रिस्टिअन हेनिमन यांचा जन्म १० एप्रिल १७५५ मध्ये झाला. हा दिवस विश्व होमिआॅेपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. होमिओपॅथी डॉक्टरांच्यावतीने मंगळवारी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. होमीओपॅथी ही समग्र चिकित्सा पद्धती आहे. या व्याधीवर उपचार करताना व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक पातळीचा विचार केला जातो. राजकमल चौकातही विश्व होमिओपॅथी दिन सायंकाळी ६ वाजता साजरा करण्यात येणार आहे.
डॉ. हेनिमन एमडी आॅलोपॅथीचे चिकित्सक होते. ते औषध व रसायन शास्त्राच्या पुस्तकांचे लेखक, व अनुवादक होते. त्या काळातील आधुनिक चिकित्सा पद्धती त्यांना अस्वस्थ करीत होती. मुख्यत: उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी रक्त वाहिनी कापून कृत्रिमरीत्या रक्तस्त्राव होऊ देणे, अतिशय तीव्र औषधांचे डोस, मरण यातना होईपर्यंत चिकित्सा हे त्या काळातील मुख्य आॅलोपॅथीचे गमक होते. हे सर्व पाहुण त्यांनी त्याकाळी आधुनिक चिकित्सा पद्धतीने उपचार करणे सोडुन स्वत:ला पूर्णता एक लेखक व अनुवादक म्हणून समर्पित केले. या होमीपॅथी चिकित्सा पद्धतीला त्यांची मोठी देण लाभली आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा विश्व होमीपॅथी दिवस म्हणून पाळला जातो, अशी माहिती होमीओपॅथी तज्ज्ञ मोहनदास गाडबैल, डॉ. रत्ना चोपडे दिली. आज होमीपॅथीमुळे अनेक आजारांवर रामबाण इलाज होऊन रुग्ण बरे होत आहेत.
होमिओपॅथीचाच उपचार का?
होमिओपॅथी ही समग्र चिकित्सा पद्धती आहे. या व्याधीवर उपचार करताना व्यक्तीच्या मानसिक, शारीरिक व सामाजिक पातळीचा विचार केला जातो. तसेच होमिओपॅथी औषधी वनस्पती, प्राणी, रसायन, सूर्यचंद्राची किरणे, पूयविषपासून तयार केले जाते. मात्र, ते तीव्रतेने पोटेंसिच्या माध्यमाने कमी केले जाऊन त्याची गुणवत्ता वाढविली जाते. म्हणून ते अमृततुल्य विषाला मारणारे शास्त्र आहे. होमिओपॅथी औषधी देताना शरिराची प्रतिकारशक्ती व रोगप्रतिकारशक्ती यांचा विचार करून डोस पोटेन्सी व रिपिटेशन आॅफ मेडिसिन दिले जाते. यालाच मोड्स आॅपरेन्डी म्हणतात.

Web Title: Homeopathy is a holistic medical practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.