माँसाहेबांना मानवंदना अन् मानाचा मुजराही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:17 PM2018-01-12T23:17:36+5:302018-01-12T23:20:31+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : छत्रपती विचार मंचतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जयंती उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी शहरातून काढण्यात आलेली रॅली व जिजाऊंच्या जयघोषाने अंबानगरी दुमदुमून निघाली.
रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, मुलींवर होणारे अॅसिड हल्ले, छेडखानी, हगणदारीमुक्त शहर आदी सामाजिक विषयांकडे लक्ष वेधणाऱ्या अप्रतिम पथनाट्यांचे मुख्य चौकात सादरीकरण केले.
यावेळी श्यामनगर चौकातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला मानवंदना देऊन व पूजन करून रॅलीला सुरुवात झाली. राजकमल चौक, इर्र्विन चौक, गाडगेनगर, कठोरा नाका, आरटीओ चौकातून शेकडो युवक, मुलींनी मोटरसायकल रॅली काढून जिजाऊ माँसाहेबांचा जयघोेष केला. यावेळी वैभव बिजवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तर प्रियंका मानकर यांनी जिजाऊंची वेशभूषा साकारली होती. ते या रॅलीचे विशेष आर्कषण ठरले होते. यावेळी जिजाऊ बुरघाटे या लहान मुलीनेही जिजाऊ माँसाहेबांची वेशभूषा साकारली होती.
रॅलीमध्ये छत्रपती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सुमीत देशमुख, उपाध्यक्ष सागर देशमुख, अर्पित वडतकर, राहुल देशमुख, जयपाल उत्तमानी, सचिन मेहरे, रूषीकेश चौधरी, प्रणीत शेखार, अविनाश शिंदे, मयूर पाकधुने, विक्की सोळंके, मंगेश लोणकर, रूपाली धोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ठिकठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण विनय भगत व दिनेश गोहत्रे यांच्या नेतृत्वातील चमूने केले.
राष्ट्रमाता जिजाऊ चौकात मानवंदना
जिजाऊ बिग्रेड, संभाजी बिग्रेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ बँकेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून, मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा केला.
शहरात शुक्रवारी ठिकठिकाणी जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, शिवाजी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे एनएसएस पथक यांनीही सहभाग घेतला. कार्यक्रमाला उपमहापौर संध्या टिकले, जिजाऊ बँकेचे शरद भोकसे, अर्चना बारबुद्धे, मनोज काळमेघ, मंजूषा घोडमारे, चंद्रशेखर पाथरे, अभिजित पवित्रकार, अंकीत चौधरी, हर्षक ढवक, मनीषा तायडे, गणेश धाकतोडे, पंडित मोर्शे, मनीष बोडखे, चंद्रशेखर पाथरे, प्रीती देशमुख, कविता उगले, विवेक हाते, राजेश बंड, वृषभ महल्ले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष तुषार देशमुख, निखिल काटोलकर, जिजाऊ बिग्रेडच्या कांचन उल्हे, मोहिते, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राम देशमुख रजत विधळे, प्रसेनजित देशमुख, योगेश देशमुख, कनिकेश पवार, आशिष पर्वते, अंकित भाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होेते.