सरपंच,उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:23 AM2021-02-18T04:23:01+5:302021-02-18T04:23:01+5:30

मिटींग भत्यासाठी केवळ २०० रुपयांची तोकडी तरतूद अमरावती : पंचायत राज व्यवस्थेच्या बळकटीसाठी ग्रामपंचायतीला थेट निधी वळता केला ...

Honorarium to Sarpanch, Deputy Sarpanch, but only tea to members | सरपंच,उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

सरपंच,उपसरपंचांना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

Next

मिटींग भत्यासाठी केवळ २०० रुपयांची तोकडी तरतूद

अमरावती : पंचायत राज व्यवस्थेच्या बळकटीसाठी ग्रामपंचायतीला थेट निधी वळता केला जात आहे. ग्रामपंचायतींचे कामकाज पाहणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचांना लोकसंख्येच्या आधारावर मानधन दिले जाते. हे मानधन सदस्यांना मात्र मिळत नाही. यातून ग्रामपंचायतीत कामाचा संपूर्ण ताण सरपंचांवर पडत आहे.

गावाची लोकसंख्या कमी असो अथवा अधिक कामकाज सारखेच आहे. यामुळे मानधनात सरपंच व उपसरपंचांना लोकसंख्येनुसार वर्गीकरण नसावे, असे मतही सरपंचांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्यांना पूर्वी बैठक भत्ता केवळ २५ रुपये मिळत होता. आता त्यात वाढ केली असून २०० रुपये बैठकीसाठी भत्ता दिला जातो. मात्र, मानधन नसल्याने सदस्यांना बँक भत्ता आणि चहापान्यावरच समाधान मानावे लागते. सरपंचांना ७५ टक्के मानधन तरतूदीमधून दिले जाते. २५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून घ्यावयाची आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे उत्पन्नच कमी असल्याने मानधन मिळविताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ही संपूर्ण तरतूद शासनाच्या तिजोरीतून व्हावी सरपंच,उपसरपंच आदीसह सदस्यांनाही भरीव मानधन मिळावे अशी मागणी होत आहे.

बॉक्स

मानधन ३००० ते ५०००

लोकसंख्या निहाय सरपंच उपसरपंच मानधन

० ते २००० ३००० रू १०००रू

२००१ते ८००० ४०००रू १५०० रू

८ हजारांहून जास्त ५०००रू २०००रू

निवडून आलेल्या सदस्यांना २०० ते ३०० रूपये बैठक भत्ता आणि चहा पाणी एवढयावरच समाधान मानावे लागते.

बॉक्स

सरपंच काय म्हणतात?

कोट

सरपंचाप्रमाणे सदस्यांना मानधन मिळाले.तर त्याचा फायदाच होईल.दर महिन्याला मिळणार्या मानधनात संपूर्ण वाटा शासनाचाच असला पाहीजे.तरच अडचण येणार नाही.

- विपीन अनोकार,

सरपंच निमखेड बाजार

कोट

ग्रामपंचायतच्या विविध निर्णयात सरपंच,उपसरपंचांसह सदस्यांचा महत्वाचा सहभाग असतो.आपली कामे सोडून सर्व मंडळी ग्रामविकासासाठी प्रयत्त करतात. याकरिता बैठकींना उपस्थित असतात. त्यामुळे सदस्यांना मानधन लागू करण्यासह सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ व्हावी.

- कविता विनोद डांगे,

सरपंच, नांदगाव पेठ

कोट

ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच,उपसरपंचांसह सदस्यांना मासिक बैठकीला उपस्थित राहावे लागते.यासोबतच सरपंचाना वर्षाचे ३६५ दिवस गाव तसेच ग्रामस्थांसाठी काम करावे लागते. त्या तुलनेत पदाधिकाऱ्याचे मानधन अत्यल्प आहे. सदस्यांनाही मानधन द्यावे आणि यात वाढ करावी.-

विनोद सोनोने,

सरपंच, सासन रामापूर

बॉक्स

जिल्ह्यात निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती ५५३

निवडून आलेले सदस्य ४९०३

सरपंच ५५१

Web Title: Honorarium to Sarpanch, Deputy Sarpanch, but only tea to members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.