अंजनगावात परतलेल्या बीएसएफ जवानाचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:14+5:302021-02-11T04:14:14+5:30
अंजनगाव सुर्जी : देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी बीएसएफमध्ये २१ वर्षे खर्ची घालून गावी परतलेल्या सुपुत्राचा अंजनगाववासीयांनी आगळावेगळा सत्कार केला. स्थानिक ...
अंजनगाव सुर्जी : देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी बीएसएफमध्ये २१ वर्षे खर्ची घालून गावी परतलेल्या सुपुत्राचा अंजनगाववासीयांनी आगळावेगळा सत्कार केला.
स्थानिक शेतकरीपुत्र राजेश किसन अस्वार असे या सत्कारमूर्तीचे नाव आहे. ते १९९६ मध्ये बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (बीएसएफ) मध्ये दाखल झाले होते. अंजनगाव येथील गणेश बोडखे व त्यांच्या मित्र परिवाराचे संकल्पनेतून बोराळा येथील गणपती मंदिरात राजेश अस्वार यांचा सत्कार पार पडला. याप्रसंगी माजी आमदार रमेश बुंदीले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, प्रदीप देशमुख, मंत्रालयातील उपसचिव सतीश तिडके, मंजूषा लोळे, गौरव नेमाडे, नंदकिशोर काकड, अलका बोडखे, संध्या अस्वार आदी उपस्थित होते
कार्यक्रमासाठी सतेंद्र गडपायले, प्रवीण शेळके, किशोर भावे, गोपाल अस्वार, विशाल व्यवहारे, सुशील मेहकरे, महेश अळसपूरकर, पवन बोडखे, आकाश येऊल, राजेंद्र थोरात, अनिल वनकर यांनी अथक परिश्रम घेतले. संचलन गणेश बोडखे यांनी केले. आभार प्रदर्शन सतेंद्र गडपायले ह्यांनी केले