कुलगुरूंच्या हस्ते शहीद कुुटुंबीयांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:14 AM2021-01-25T04:14:38+5:302021-01-25T04:14:38+5:30
बडनेरा : भारत भूमीच्या रक्षणार्थ २३ डिसेंबर २०२० रोजी शहीद कैलास कालूजी दहिकर तथा गडचिराेली येथे काही वर्षांपूर्वी ...
बडनेरा : भारत भूमीच्या रक्षणार्थ २३ डिसेंबर २०२० रोजी शहीद कैलास कालूजी दहिकर तथा गडचिराेली येथे काही वर्षांपूर्वी नक्षलवादी हल्ल्यात शहीद उपेंद्र गुडदेकर यांच्या कुटुंबीयांचा सन्मान येथील आनंद परिवाराच्यावतीने नुकताच करण्यात आला.
शहीद कैलास दहिकर यांच्या मातोश्री मंगराय, वडील कालूजी दहिकर, पत्नी, मुलगी, सासू व सासरे निराधार झाले. या संपूर्ण कुटुंबाला जगण्याचे बळ देण्याकरिता आनंद परिवाराने त्यांचा सन्मान सोहळा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. या सोहळ्याचा प्रारंभ मातृभूमीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कुलगुरू चांदेकर यांनी शहीद कैलास यांच्या कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, वस्त्र व आर्थिक सहाय्य देऊन सन्मानित केले. तसेच शहीद उपेंद्र गुडदेकर यांचे आई रजनीताई व वडील धनंजय गुडदेकर यांचा सुरक्षा सन्मान केला. यावेळी कुलगुरू चांदेकर यांनी शहिदांच्या बलिदानाचे महत्त्व विशद करताना कैलास दहिकर यांच्या कुटुंबाच्या शिक्षणाची जबाबदारी विद्यापीठातर्फे स्वीकारण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी कमलताई गवई, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पी.टी. पाटील, अभिनंदन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा, गोंविद कासट, प्रदीप जैन, अरुण कडू, अविनाश राजगुरे, विवेक सहस्त्रबुद्धे, जवाहर गांग, कंवरीलाल ओस्तवाल, राजू डांगे, दीपक दारव्हेकर, अविनाश राजगुरे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन संतोष बनसोड यांनी तर आभार प्रदर्शन शिवराय कुलकर्णी यांनी केले.
-------------------------------
बङनेऱ्यातील गुरांच्या बाजारातील कोट
कोराेना काळात गुरांच्या बाजारात खरेदी- विक्रीवर बराच परिणाम झाला. मात्र, मिशेन बिगेन अंतर्गत आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने गुरांच्या बाजारात आर्थिक उलाढालीने झेप घेण्यास सुरुवात केली आहे.
-किरण साबळे, विभाग प्रमुख, बाजार समिती अमरावती