आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:39+5:302021-07-15T04:10:39+5:30
कॅप्शन - ज्येष्ठ आंबेडकरवादी समाजसेवक हरिभाऊ सरदार यांचा सत्कार करताना प्रताप अभ्यंकर, आनंद गायकवाड ----------------------------------------------------------------------------------- पन्नास वर्षांपासून समाजसेवा प्रेरणादायी ...
कॅप्शन - ज्येष्ठ आंबेडकरवादी समाजसेवक हरिभाऊ सरदार यांचा सत्कार करताना प्रताप अभ्यंकर, आनंद गायकवाड
-----------------------------------------------------------------------------------
पन्नास वर्षांपासून समाजसेवा प्रेरणादायी - प्रताप अभ्यंकर
परतवाडा : तळागाळातील नागरिकांपर्यंत आंबेडकरी चळवळ पोहचविण्यात अनेकांनी आपले अख्खे आयुष्य झिजविले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्व गोरगरिबांपर्यंत येताना तत्कालीन राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्यांचा हृदय सत्कार सर्वांचे आयुष्याला प्रेरणा देणारा असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी व्यक्त केले
आयुष्यातील ५० हून अधिक वर्षे एक चळवळ राबविणाऱ्या अचलपूर तालुक्यातील ज्येष्ठांच्या सत्कारप्रसंगी प्रताप अभ्यंकर बोलत होते. वृक्षारोपण, वृद्धाश्रमात अन्नदान असे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले. राजकीय क्षेत्रातून समाजकारण व विविध उपक्रमांत सहभागी राहणारे प्रताप अभ्यंकर यांनी अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा येथील हरिभाऊ सरदार, डॉ. धाकडे, इंद्रभान गायगोले, असदपूर येथील देविदास नितनवरे या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक आनंद गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
-------------
दादासाहेबांचा सहवास प्रेरणादायी
दादासाहेब रा.सू.गवई यांच्या सहवासात अनेक ज्येष्ठांनी समाजातील नागरिकांपर्यंत आंबेडकर चळवळ ५० पेक्षा अधिक वर्षांपासून चालविली आहे. आजही अविरत सुरू असून या ज्येष्ठांचे अमूल्य योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सत्कारमूर्ती म्हणाले.