हुक्का पार्लर बंद, धाडसत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 09:49 PM2018-10-09T21:49:20+5:302018-10-09T21:49:47+5:30

'दम मारो दम' चालणाऱ्या हुक्का पार्लरला राज्यात बंदी लागू करण्यात आली. त्यासंबंधाने निघालेल्या अधिसूचनानुसार अमरावती शहरातही निर्णयाच्या अंमलबजावणीचे काटेकोरपणे पालन सुरू झाले आहे.

The hookah parlor closed, the trips started | हुक्का पार्लर बंद, धाडसत्र सुरू

हुक्का पार्लर बंद, धाडसत्र सुरू

Next
ठळक मुद्देनिर्णयाची अंमलबजावणी : गुन्हे शाखेचे धाडसत्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'दम मारो दम' चालणाऱ्या हुक्का पार्लरला राज्यात बंदी लागू करण्यात आली. त्यासंबंधाने निघालेल्या अधिसूचनानुसार अमरावती शहरातही निर्णयाच्या अंमलबजावणीचे काटेकोरपणे पालन सुरू झाले आहे. मंगळवारी शहर पोलिसांनी विविध ठिकाणी धाडसत्र राबवून हुक्का पार्लरची झाडाझडती घेतली, सद्यस्थितीत ते हुक्का पार्लर बंद असल्याचे आढळले. मात्र, पोलिसांच्या धाडसत्राने हुक्का पार्लर व्यवसायिकांचे धाबे दणाणले होते.
अमरावतीच्या संस्कृतीला गालबोट लावणारे हुक्का पार्लर कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश निर्गमित झाले.हुक्का पार्लर बंदी लागू झाल्याच्या सूचना अमरावती पोलिसांना मिळाली असून, त्या अनुषंगाने गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपापल्या हद्दीतील हुक्का पार्लरची झडती सुरू केली. मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाने नित्यानंद कॉलनीतील काफीला, विद्यापीठ रोडवरील कस्बा, रेल्वेस्थानक ते बसस्थानक मार्गावरील बॉम्बेस्ट्रिट व अंबोदवी रोडवरील हॉटस्पॉटची झडती घेतली. मात्र, या चारही ठिकाणी हुक्का पार्लरसंबधाने पोलिसांच्या हाती काही लागले नाही. हे सर्व धाडसत्र दिवसा टाकण्यात आले आहे. मात्र, हा सायंकाळनंतर सुरु होतो. याची पाहणी पोलिसांकडून केली जाईल. यामुळे युवापिढीचे भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी तत्काळ हुक्का पार्लर बंद करण्यात यावे, अशी मागणी युवा स्वाभिमानी पार्टीने पोलीस आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.
लोकमतच्या पाठपुराव्याला यश
गतवर्षी शहरात हुक्का पार्लरचा व्यवसाय जोमात सुरू होता. त्यावेळी 'लोकमत'ने शहरातील हुक्का पार्लर युवापिढीसाठी कसे घातक ठरू शकते, याबाबत वृत्ताकंन केल्याने पोलीस विभागाने कारवाईचा सपाटा चालविला होता.

Web Title: The hookah parlor closed, the trips started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.