बिबट्याने कोंबड्या केल्या फस्त

By admin | Published: July 11, 2017 12:11 AM2017-07-11T00:11:37+5:302017-07-11T00:11:37+5:30

बिबट्याच्या एका दोन वर्षीय बछड्याने शेतशिवारात शिरून कोंबड्या फस्त केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. वनाधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

Hooked by a leopard | बिबट्याने कोंबड्या केल्या फस्त

बिबट्याने कोंबड्या केल्या फस्त

Next

पोहरा शेतशिवारातील घटना : वनाधिकाऱ्यांनी केला पंचनामा
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : बिबट्याच्या एका दोन वर्षीय बछड्याने शेतशिवारात शिरून कोंबड्या फस्त केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. वनाधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. त्याचे झाले असे की, पोहरा शिवारात प्रेमसिंग पवार यांचे शेत असून शेताला लागून चिरोडीचे वनक्षेत्र आहे.
शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून जाळीचे कम्पाऊंड करून त्यात गावरानी कोंबड्यांना राहण्याची सुविधा केली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याचा छावा शेतशिवारात शिरला. जाळीच्या कम्पाऊंडमध्ये शिरून झोपडीवजा खुराड्यात घुसला आणि कोंबड्या फस्त केल्यात. सकाळी शेती मालक वनधिकारी विनोद कोहळे यांना भेटून घटनेची माहिती दिली असता वनरक्षक एन.जी. नेतनवार, पी.बी. शेंडे, आर.के. खडसे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. दरम्यान बिबट्याचे पगमार्क आढळून आले. घटनास्थळावर एक कोंबडी मृत आढळून आली. जाळीच्या कुंपणात कोंबड्यांचे पंख आणि पाय दिसून आले. शेतीच्या धुऱ्यावर दोन कोंबड्यांचे मांस व आतड्या आढळून आल्या. त्याठिकाणी पंख आढळून आले. घटनास्थळी केवळ एक कोंबडी मृत आढळून आली. दोन कोंबड्याचे मांस आढळून आल्याने बिबट्याच्या बछड्याने कोंबड्या ठार मारल्याचे पृष्ठी वनाधिकाऱ्यांनी केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी ४० च्या आसपास कोंबड्या बिबट्याने ठार मारल्याचे सांगितले. आतापर्यंत बिबट माणसाला, जनारास ठार मारल्याची घटना उघडकीस आली.

कोंबडीने वाचविले स्वत:चे प्राण
बिबट्याने मध्यरात्री खुराड्यात प्रवेश केला तेव्हा उंचावर टोपलीत एक कोंबडी अंडी उबवित होती. खुराड्यात आरडाओरड सुरू असताना त्या टोपलीतील कोंबडीने खाली उडी न घेता निपचित टोपलीतच बसली राहिली, त्यामुळे तिचे प्राण वाचले.

Web Title: Hooked by a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.