फुललेल्या तुरीपासून शेतकऱ्यांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:00 AM2020-11-28T05:00:00+5:302020-11-28T05:00:35+5:30

शेजारी यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या बातम्या झळकल्या. ढगाळ वातावरण आणि पावसाचा धोका तूर पीक फुलोर अवस्थेत आणि परिपक्व होण्याचे अवस्थेतच बहरलेले हे तुरीचे पीक जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाचा उत्पन्नाचा विषय हा स्वप्नरंजनाचा ठरतो, असा अनुभव आहे. तरीही यावर्षी तूर आक्रमकतेने पेरल्या गेली आणि तुलनात्मकरीत्या गतवर्षीपेक्षा यावर्षी भरघोस उत्पन्नाची शक्यता आहे.

Hope for the farmers | फुललेल्या तुरीपासून शेतकऱ्यांना आशा

फुललेल्या तुरीपासून शेतकऱ्यांना आशा

Next
ठळक मुद्देअंजनगाव तालुक्यातील शिवारात तूर बहरली, मूग, उडीद, सोयाबीनने रडविले

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील एकूण अंदाजे ५० हजार हेक्टरपैकी सहा हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर यंदा अंजनगाव सुर्जी परिसरात तुरीची लागवड झाली असून, खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन व कापसाच्या नुकसानानंतर एकमेव भरवशाचे पीक म्हणून या पिकाची अपत्याप्रमाणे शेतकरी वर्ग काळजी घेतो आहे.
शेजारी यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या बातम्या झळकल्या. ढगाळ वातावरण आणि पावसाचा धोका तूर पीक फुलोर अवस्थेत आणि परिपक्व होण्याचे अवस्थेतच बहरलेले हे तुरीचे पीक जोपर्यंत घरात येत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाचा उत्पन्नाचा विषय हा स्वप्नरंजनाचा ठरतो, असा अनुभव आहे. तरीही यावर्षी तूर आक्रमकतेने पेरल्या गेली आणि तुलनात्मकरीत्या गतवर्षीपेक्षा यावर्षी भरघोस उत्पन्नाची शक्यता आहे. शिवारात सध्या तुरीचा पिवळाधम्म फुलोर त्याच्या मातीतल्या सुगंधासह दरवळत असून, शेतकरी वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देशी, संकरित बियाण्याचे तुरीचे पीक त्याने वाणानुसार पाच ते सहा महिन्यांत तयार होते. जुलै-ऑगस्ट या पेरणीपासून डिसेंबरअखेर आणि जानेवारीचे सुरुवातीस तूर बाजारात येते. टपोर दाण्याचे गावरान वाणाचे उत्पन्न त्यामानाने बारीक असलेल्या संकरित वाणापेक्षा कमी येते. तुरीचा खोडवा मक्ता घेतला जात नाही. पण एखाद्या परसबागेत जगवलेले देशी वाण वर्षानुवर्षे संबंधित कुटुंबाची भाजीची गरज भागविते. अळ्यांचा प्रादुर्भावही या पिकाच्या उत्पादन क्षमतेला फटका देणारी कायम समस्या असली तरी सध्या अति प्रगत आणि संशोधन विकास पद्धतीने शोधलेल्या औषधीच्या संरक्षणामुळे तूर किडीपासून बचावली आहे.
चार वर्षांपूर्वी तुरडाळ १६० रुपये किलोवर पोहोचली होती. तेव्हापासून तूर नियंत्रण कायदा आणि धोरण प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली.
मराठीत तूर, हिंदीत अरहर आणि इंग्रजीत पीजनपी नावाने ओळखले जाणारे तुरीचे पीक देशात सर्वदूर एक प्रमुख पीक आहे. शेतकरी कुटुंबाची अर्थव्यवस्था सांभाळून कमी पैशात त्याच्या कुटुंबाची प्रथिनांची गरज तुरीमुळे भागविली जाते. सोबतच तुरीचे वरण हा प्रतिष्ठेचासुद्धा विषय आहे. प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया। रशिया आणि ऑफ्रीकन देशांमधून तुरदाळ आयात करून देशातील नागरिकांची गरज भागविण्याचे संतुलन केंद्र शासनातर्फे साधले जाते. तुरीची आयात करण्याचे धोरण नागरिक धार्जीणे आहे.

शासनाने तूर खरेदी करण्याची गरज
थेट रेशन दुकानातील पुरवठ्यात तुरडाळ समाविष्ट करणारे शासन त्वरित लोकप्रिय होते. त्यामुळे जास्तीत जास्त जनतेपर्यंत दारू पुरवठा होण्यासाठी मोदी शासनाने ‘मोनांबिक’ ह्या आफ्रीकन देशातून तुरडाळ आयात करार केला आहे. किमती नियंत्रणात ठेवणे ह्या उद्देशाने केलेला हा करार शेतकरी वर्गाला मात्र मारक ठरत आहे. पुढील वर्षाचे सुरुवातीला तुरीचे पीक तयार होत आहे. कमाल समर्थन मुल्य जरी सहा हजार रुपये क्विंटल असले तरी शासनाने खरेदी सुरू केल्याशिवाय ही किंमत शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून शासनाने यावर्षी तूर खरेदी केली पाहिजे.

घराघरात सोलेभाजी लोकप्रिय
सोलेभाजी हा विदर्भातील शेतकरी कुटुंबाचा स्थायी भाव आहे. तुरीचे दाणे आता भरत आले आहेत. लवकरच झणझणीत हिरव्या मिरचीची फोडणी देऊन घरोघरी सोलेभाजी जेवणाचा महोत्सव शेतकरी कुटुंबात सुरू होईल. शेजारीपाजारी कुटुंबांनासुद्धा ओल्या शेंगांचे ‘आडणे’ दिले जाईल. शेंगा वाढून कडक होईपर्यंत हा सोलेभाजीचा आस्वाद शेतकरी कुटुंबात वारंवार घेतला जातो.

Web Title: Hope for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी