आशा, गट प्रवर्तकांचा बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:10 AM2021-06-22T04:10:03+5:302021-06-22T04:10:03+5:30
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तिकांच्या कामाची दखल न घेता त्यांच्यात कुठल्याच प्रकारची मानधनात वाढ न करता त्या कोरोनाकाळात जीवाची ...
आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तिकांच्या कामाची दखल न घेता त्यांच्यात कुठल्याच प्रकारची मानधनात वाढ न करता त्या कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता शासन नियमाचे पालन करून सेवा दिली. त्या कामात आशा सेविका व गट प्रवर्तिकांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. त्यात त्यांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्वे करून कामे केली आहेत.
एवढेच नाही तर गावातील नागरिकांच्या शिव्या ऐकून त्यांनी सेवेसाठी भांडणेसुद्धा केली. परंतु याची परवा शासनाला नाही. असे सुस्त सरकार आशा सेविकांवर मेहरबान होईल काय?
असा प्रश्न प्रवर्तिकांनी केला आहे. आशा सेविका ह्या एखाद्या डॉक्टरप्रमाणे जीवाची पर्वा न करता कामे करीत आहेत. परंतु, त्यांना मोबदला किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीत, हे किती योग्य आहे, असा सूर यातून निघत आहे. त्या कोविड सेंटरमध्ये जाऊन नागरिकांनच्या टेस्टसुद्धा त्यांनी केल्या आहेत. तरीसुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण करीत नाहीत. म्हणून महाराष्ट्रभर नाहीतर अंजनगाव सुर्जी तालुक्यात तहसीलदारांना जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत कामावर बहिष्कार टाकत आहोत, असे निवेदन तहसीलदार अंजनगाव येथील दिले.