कर्णकर्कश्श हॉर्न बिनदिक्कत, कारवाई केवळ ६१ वाहनचालकांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:03+5:302021-06-26T04:10:03+5:30

पान २ चे लिड असाईनमेंट प्रदीप भाकरे अमरावती : कानाला इजा पोहचविणारे कर्णकर्कश्श हॉर्न शहरात बिनदिक्कत वाजविले जातात. नेमके ...

Horny horn without problem, action on only 61 drivers | कर्णकर्कश्श हॉर्न बिनदिक्कत, कारवाई केवळ ६१ वाहनचालकांवर

कर्णकर्कश्श हॉर्न बिनदिक्कत, कारवाई केवळ ६१ वाहनचालकांवर

Next

पान २ चे लिड

असाईनमेंट

प्रदीप भाकरे

अमरावती : कानाला इजा पोहचविणारे कर्णकर्कश्श हॉर्न शहरात बिनदिक्कत वाजविले जातात. नेमके अशा ठिकाणी पोलीस नसल्याने अशा हुल्लडबाज वाहनचालकांचे चांगलेच फावले आहे. एरवी वाहतूक पोलीस कारवाई करतील, या भीतीने मुख्य चौकातून ते वाहनचालक मुकाट जातात. महाविद्यालय, शाळा दिसल्यास नेमका हॉर्न वाजविला जातो. आता ते बंद असल्याने शहरात सायंकाळी ७ नंतर रस्त्यावर हॉर्न वाजविले जातात.

गतवर्षी मार्चपासूनच शाळा-महाविद्यालयांना टाळे लागल्याने कर्णकटू तसेच मोठ्या आवाजाचे म्युझिकल हॉर्न वाजवून ‘इम्प्रेस’ करायचे तरी कुणाला, असा प्रश्न हुल्लडबाजांना पडला. परिणामी, सन २०२० मध्ये अवघ्या २७, तर मे २०२१ पर्यंत ३४ जणांवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, गतवर्षी व यंदादेखील कित्येक महिने लॉकडाऊन असताना, अकारण फिरण्यास बंदी असतानादेखील वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल १ कोटी ७९ लाख ४३ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात ८७ हजार ९०१ प्रकरणांमधून १ कोटी ११ लाख ६ हजार ८५० रुपये, तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ६६ हजार ३१ वाहनचालकांकडून ६७ लाख ८२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील सर्वाधिक दंड वसूल झाला तो नो-पार्किंगमध्ये लागणाऱ्या वाहनांच्या चालकांकडून.

बॉक्स

इतक्या वाहनचालकांवर झाली कारवाई

कारवाईचा प्रकार २०२० - २०२१ (मेपर्यंत)

सिग्नल तोडला - ३४० - १५६४

नो पार्किंग - ८९४१ - ४३५७

हेल्मेट नाही - ३१ - १५

कर्णकर्कश हॉर्न - २७ - ३४

-----------

सन - एकूण प्रकरणे - दंड (रुपये)

२०२० - ८७,९०१ - १, ११, ६१८५०

२०२१- ६६,०३१ - ६७, ८२,०००

------------

वाहतूक पोलीसप्रमुख म्हणाले

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर निरंतर कारवाई सुरू आहे. कोरोनाकाळातही वाहतूक शाखेने सर्वाधिक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. दंडाची ती रक्कम सुमारे १ कोटी ७९ लाखांच्या जवळपास आहे. कर्णकर्कश्श हॉर्न वाजविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे.

- किशोर सूर्यवंशी, सहायक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक

----------------

कानाचेही आजार वाढू शकतात

ध्वनिप्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम अतिशय गंभीर आहेत. त्यात ऐकायला कमी येणे, कानात बेल वाजत राहिल्यासारखा आवाज येणे, झोपेत सतत बिघाड होणे, अस्वस्थता वाटणे, वेदना होणे वा थकवा येणे, कामाच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा कमी होणे, बोलण्यामध्ये अडथळा येणे, हार्मोन्समध्ये बदल होण्याचा समावेश आहे. कुठल्याही अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त आवाज जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो व दैनंदिन जीवनामध्ये अडथळा आणतो, त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम कानावर होतो.

------------

म्युझिकल हॉर्नची फॅशन

शहरातील नवतरुण आपल्या महागड्या दुचाकींना म्युझिकल हॉर्न लावतात. सध्या शहरात त्याची क्रेझ दिसून येत आहे. आपण कसे वेगळे आहोत, लावलेला हॉर्न किती महागडा आहे, त्यावर ही फॅशन दिवसेंदिवस वाढायला लागली आहे. सोबतच प्रेशर हॉर्न, बुलेट हॉर्न, सायरन हॉर्नदेखील पाहायवास मिळतो.

-----

कर्णकर्कश्श हॉर्न वाजविला तर...

पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार शांतता झोन असलेल्या परिसरात ५० डेसिबल, निवासी झोन परिसरात ५५ डेसिबल, वाणिज्य झोन परिसरात ६५ डेसिबल, तर औद्योगिक झोन परिसरात ७५ डेसिबलपेक्षा कमी ध्वनिपातळी ठेवणे आवश्यक आहे. कारवाईत दोषी आढळल्यास वाहनचालकांना पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात येणार आहे. तर, कर्णकर्कश्श हॉर्न वाजविल्यास वाहतूक पोलिसांकडून मोटर वाहन कायद्याच्या कलम ११९/२३० नुसार कारवाई केली जाते.

----------

Web Title: Horny horn without problem, action on only 61 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.