रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:36+5:302021-05-27T04:13:36+5:30

४ टक्के रुग्णांना मोफत उपचार ;आतापर्यत ३३०४ रूग्णांना लाभ अमरावती : कोरोना साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. कोरोना ...

Hospitals are the epitome of 'public health' | रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे

रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे

Next

४ टक्के रुग्णांना मोफत उपचार ;आतापर्यत ३३०४ रूग्णांना लाभ

अमरावती : कोरोना साथीच्या आजाराने डोकेवर काढले आहे. कोरोना संकटात सर्वसामान्य नागरिकांना उपचार करणे अवघड झाले आहे. हातात पैसा नसल्याने अनेक रुग्ण घरीच त्यावर उपचार करण्याच्या मानसिकतेत आहेत. यातून अनेकांचे जीव गेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १५ ते ८० हजार पर्यतचे उपचाराचे पॅकेज मंजूर केले आहे. या प्रक्रियेत सर्वानाच आपला हा सहभाग नोंदविला आहे. तो यानंतरही अनेक खासगी रुग्णालयांनी उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रस्ताव धुडकावून लावण्याची प्रक्रिया प्रारंभीच्या काळात राबविली. त्यानंतर रुग्णांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले. यामुळे आतापर्यत ३ हजार ३०४ रुग्णांना योजनेचा लाभ घेता आला. जिल्ह्यात २५ मे पर्यत ८९ हजार ५४७ रुग्णांची संख्या हजारावर पोहोचली आहे.यात आतापर्यत ३ हजार ३०४ रूग्णांचे प्रस्ताव सादर करून उपचार घेता आले. एकूण रुग्ण संख्येचा विचार केला तर ४ टक्के लोकांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे.

बॉक्स

अनेक रुग्णालये योजनेत असतानाही करतात टाळाटाळ

१) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत २१ रुग्णालयांना उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यानंतरही अनेक रुग्णालय अशा स्वरूपाचा उपचार करताना मंजुरात मिळालेल्या ठिकाणी नोंदणी करण्यास टाळाटाळ करतात.

२) अशावेळी रुग्णांना खाजगी ठिकाणावरून पैशाची व्यवस्था करावी लागते. माणसाच्या आरोग्य पेक्षा पैसा मोठा नाही. आपल्या जवळील असलेल्या मौल्यवान वस्तू गहाण ठेवून उपचारासाठी पैसे जुळविले जातात.

३) महात्मा फुले जनआरोग्य योजना ही चांगली असून यात जवळपास १२९९ उपचाराचा समावेश आहे.या योजनेत अजून काही योजनांची समावेश करण्याची गरज असल्याचे विलास रेहपांङे यांनी सांगितले.

बॉक्स

.. तर करा तक्रार

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा समावेश असतानाही योजनेचा लाभ न दिल्यास जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदविता येते. ठराविक पॅकेजमध्ये उपचार पद्धती देणे बंधनकारक आहे. यालाच नाकारल्यास तक्रार करता येते.

बॉक्स

१५ ते ८० हजाराचे पॅकेज

या योजनेमध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी १५ ते ८० हजाराचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे.

इतर आजाराकरिता योजनेमध्ये एका कुटुंबासाठी वर्षभरात दीड लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाची मर्यादा आहे.

कोविड मध्ये सर्वच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.

बॉक्स

अशी करा नोंदणी

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड आणि आधार कार्ड घेऊन केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील या विभागाकडे नोंदणी करावी लागते.त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक कार्ड या विभागाकडून लाभार्थ्याला दिले जाते.हे कार्ड दाखवून या योजनेत समाविष्ट असलेल्या रूग्णालयात जाऊन रूग्णांना लाभ घेता येतो?

बॉक्स

अशी आहे आकडेवारी

योजनेशी जोडलेले रुग्णालय -२१

एकूण कोरोना बाधित- ८९५४७

एकूण कोरोना मुक्त-८०५२२

आतापर्यंत झालेले मृत्यू-१३९०

उपचार सुरू असलेले रुग्ण-७६३५

Web Title: Hospitals are the epitome of 'public health'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.